शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या संपानंतर एसटी आली पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:28 IST

दोन दिवसांच्या संपानंतर एसटी पूर्वपदावर आली. सेवा सुरू झाल्यानंतर १५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबई-पुणे मार्गासह उर्वरित मार्गावर मोठी गर्दी होती.

मुंबई - दोन दिवसांच्या संपानंतर एसटी पूर्वपदावर आली. सेवा सुरू झाल्यानंतर १५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबई-पुणे मार्गासह उर्वरित मार्गावर मोठी गर्दी होती. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे रविवारी घरी परतणाºया प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.१५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने चाकरमान्यांची मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी झाली होती. मुंबई-पुणे मार्गासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण येथून मुंबईकडे येणाºया बहुतांश एसटी फुल्ल भरून धावत होत्या. रविवारी मुंबई-उपनगरात पावसाने दांडी मारल्यामुळे प्रवास सुखरूप झाल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत होती. संपानंतर राज्यातील सर्व मार्गांवर एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. दहावीचा निकाल लागल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी परतीच्या प्रवासाला चाकरमान्यांनी सुरुवात केली.महामंडळातील हजारो कर्मचाºयांनी गुरुवार मध्यरात्रीपासून उत्स्फूर्तपणे संप पुकारला. शुक्रवार-शनिवारी संपामुळे राज्यातील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी रात्री उशिरा परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि एसटीतील सर्व संघटनांनी एकत्र बैठक घेतली. बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा संप मागे घेण्याचे आवाहन सर्व संघटना आणि मंत्री रावते यांनी कर्मचाºयांना केले.मंत्री रावते आणि एसटीतील संघटनांच्या अहंकारामुळे राज्यातील ७० लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असल्याची चर्चा महामंडळातील अधिकाºयांमध्ये रंगत आहे. दोन दिवसांच्या संपानंतर शनिवारी रात्री उशिरा सुटणाºया एसटी सेवा मार्गस्थ झाल्या. रविवार सकाळच्या सत्रात एसटीसेवा पूर्वपदावर आली होती. राज्यातून मुंबईकडे येणाºया एसटीमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.आरक्षणाचे पैसे परत!संपकाळात आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचे पैसे परत करण्यात येण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती महामंडळाने दिली. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtraमहाराष्ट्र