शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शगून चौकात वाहतूककोंडी

By admin | Updated: September 4, 2016 04:13 IST

गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत गर्दी असताना त्यात अवजड वाहने रस्त्यातच उभी असल्यामुळे शनिवारी शगून चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा

पिंपरी : गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत गर्दी असताना त्यात अवजड वाहने रस्त्यातच उभी असल्यामुळे शनिवारी शगून चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पोलिसांची ही कोंडी सोडविताना दमछाक झाली. तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रस्ता ओलांडण्यासाठीदेखील जागा नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला. गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपल्याने पिंपरीतील शगून चौकातील बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू आहे. गणेशोत्सवाबरोबरच हरतालिका व ऋषीपंचमी हे महिलांचे सण आल्याने शनिवारी बाजारपेठेत सकाळपासून गर्दी झाली होती. बहुतांश व्यावसायिकांनी सजावटीचे साहित्य दुकानाबाहेरच विक्रीला ठेवले असून, त्यात किरकोळ विक्रेत्यांनीदेखील रस्त्यांवर हातगाड्या उभ्या केल्या होत्या. तर माल पोहचविण्यासाठी आलेली अवजड वाहने रस्त्यातच उभी राहिल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली. रस्त्यातच ट्रक उभा करून एका व्यावसायिकांचा माल उतरविण्यात येत होता. तर रस्त्याच्या दुसऱ्या कडेलादेखील एका छोट्या टेम्पोमधून एका व्यावसायिकाचा माल उतरविण्यात येत असल्यामुळे काळेवाडीकडून येणाऱ्या वाहनांना वाहन काढताना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांनी रस्त्यातच मोटारी उभ्या केल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, माल पोहोचविण्याठी आलेल्या वाहनधारकाला या पोलिसांनी हटकले, तरीही चालकाने पोलिसांचे न ऐकता माल उतरेपर्यंत रस्त्यावरच वाहन उभे केले. पोलिसांनी कारवाई केली नाही. (प्रतिनिधी)रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असल्यामुळे काळेवाडीकडून आलेल्या पीएमपीएल बसला पिंपरीकडे येण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेलाच बस उभी करावी लागली आ़णि काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, प्रवासी व मोटारीदेखील विरुद्ध दिशेने इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगून चौकाकडे येत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी तीन वाहतूक पोलीस दाखल झाले. वीस मिनिटांपासून झालेली कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.