गरिबीवर मात करत सावित्रीच्या लेकीची ८७ अभ्यासक्रमांसह नऊ विश्वविक्रमांत नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:59 IST2026-04-26T16:59:17+5:302026-04-26T16:59:30+5:30

- जया उभे यांचे नऊ भाषांवर प्रभुत्व; महिलांमध्ये सर्वाधिक अभ्यासक्रम पूर्ण करत जागतिक पातळीवर उमटवला ठसा

Savitri's daughter overcomes poverty, holds nine world records with 87 courses | गरिबीवर मात करत सावित्रीच्या लेकीची ८७ अभ्यासक्रमांसह नऊ विश्वविक्रमांत नोंद

गरिबीवर मात करत सावित्रीच्या लेकीची ८७ अभ्यासक्रमांसह नऊ विश्वविक्रमांत नोंद

- गोविंद बर्गे

पिंपरी : खेळण्या-बागडण्याच्या वयात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी केलेले मजुरीचे काम, वडिलांच्या आजारपणासाठी झालेला खर्च, घरची हलाखीची परिस्थिती यावर मात करत तब्बल ८७ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करत नऊ विश्वविक्रमांना गवसणी घालण्याची किमया खराळवाडी येथील सावित्रीच्या लेकीने केली आहे. ॲड. जया बाळकृष्ण उभे असे त्यांचे नाव आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, फारसी, उर्दू, कन्नड, गुजराती अशा नऊ भाषांवर प्रभुत्व, हे ३८वर्षीय जया यांचे वैशिष्ट्य. जागतिक पातळीवर महिलांमध्ये सर्वांत जास्त शैक्षणिक अभ्यासक्रम मिळविण्याचे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले आहे. हे शिक्षण त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापाठीतून पूर्ण केले आहे. त्यांनी बालपणापासून गरिबीचे असह्य चटके सहन केले. वडील प्लंबर, तर आई गृहिणी. जया सातवीत असताना वडिलांच्या मधुमेहाने डोके वर काढले. त्यांना डायलिसिस करावे लागत होते. अशा कठीणप्रसंगी कोणाकडूनही आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे लहानपणी मजुरी करण्याची वेळ आली. पुढे मधुमेहाने वडिलांचे निधन झाले; परंतु आईने शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिले.

सध्या त्या पुणे विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून एम.ए.चे (लोकप्रशासन) शिक्षण घेत आहेत; तसेच पैठण येथील वारकरी संप्रदायाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेचे लेखन सुरू असून हार्मोनियमचेही शिक्षण घेत आहेत. सुमारे २५० पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. विश्वविक्रम नोंदवणाऱ्या नऊ संस्थांनी त्यांची नोंद केली आहे.


एकूण ८६ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण

डॉक्टरेट व डी.लिट. पदवी

बी.ए., एलएल.बी., एलएल.एम.

११ विषयांमध्ये एम.ए.
७ पदविका (डिप्लोमा)

६४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नियमित व दूरस्थ पद्धतीने शिक्षण पूर्ण

सध्या पुढील शिक्षण सुरू

 अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेत विविध ८७ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केले. या यशात आईचा सिंहाचा वाटा आहे. हे यश केवळ आईमुळेच मला मिळाले, दुर्दैवाने हे यश पाहायला आज ती सोबत नाही, याची खंत वाटते. - ॲड. जया उभे. 

Web Title : सावित्री की बेटी ने गरीबी को हराया, 87 पाठ्यक्रमों के साथ नौ विश्व रिकॉर्ड बनाए

Web Summary : जया उभे ने गरीबी को हराकर 87 पाठ्यक्रम पूरे किए और नौ विश्व रिकॉर्ड बनाए। कठिनाइयों के बावजूद, उन्होंने नौ भाषाओं में महारत हासिल की और विभिन्न विश्वविद्यालयों से व्यापक शिक्षा प्राप्त की। उनकी सफलता में उनकी माँ का समर्थन महत्वपूर्ण था।

Web Title : Savitri's Daughter Conquers Poverty, Achieves Nine World Records with 87 Courses

Web Summary : Jaya Ubhe overcame poverty, completing 87 courses and achieving nine world records. Despite hardship, she mastered nine languages and pursued extensive education through various universities. Her mother's support was crucial in her success.