ऑनलाइन केक मागवणे पडले महागात; महिलेला सव्वा लाखाचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:08 IST2026-05-06T19:08:15+5:302026-05-06T19:08:53+5:30

समोरील व्यक्तीने ‘पैसे रिफंड करतो’ असे सांगून महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवला.

Pune Crime Ordering cake online turned out to be expensive; Woman cheated of Rs. 1.25 lakh | ऑनलाइन केक मागवणे पडले महागात; महिलेला सव्वा लाखाचा गंडा

ऑनलाइन केक मागवणे पडले महागात; महिलेला सव्वा लाखाचा गंडा

पिंपरी : पतीच्या वाढदिवसासाठी मागवलेला केक वेळेत न आल्याने कस्टमर केअरला फोन लावलेल्या महिलेला सायबर चोरट्यांनी एक लाख ३१ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हिंजवडी फेज ३ मध्ये ३१ जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी मोबाइल क्रमांक धारक अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेल्या संबंधित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. ५ मे) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३१ जानेवारी रोजी पतीचा वाढदिवस असल्याने फिर्यादी महिलेने ऑनलाइन केक मागवला.

मात्र केक वेळेत न आल्याने फिर्यादीने गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने ‘पैसे रिफंड करतो’ असे सांगून महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवला. त्यानंतर फिर्यादीच्या बँकेच्या खात्यातून एक लाख ३१ हजार रुपये परस्पर काढून घेतले.

Web Title : ऑनलाइन केक मंगाना पड़ा महंगा: महिला को हुआ ₹1.3 लाख का चूना

Web Summary : पिंपरी की एक महिला को केक की डिलीवरी में देरी होने पर फर्जी कस्टमर केयर नंबर पर कॉल करना महंगा पड़ा, जिससे उसे ₹1.3 लाख का नुकसान हुआ। साइबर अपराधियों ने ग्राहक सेवा प्रतिनिधि बनकर उसके बैंक खाते की जानकारी हासिल कर ली और उसे धोखा दिया। महिला ने अपने पति के जन्मदिन के लिए केक मंगवाया था।

Web Title : Online Cake Order Turns Costly: Woman Duped of ₹1.3 Lakh

Web Summary : Pimpri woman lost ₹1.3 lakh after contacting a fake customer care number for a late cake delivery. Cybercriminals posing as customer service representatives defrauded her by gaining access to her bank account details after she called to inquire about a refund for the delayed cake meant for her husband's birthday.