पिंपरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.३१ टक्के, तर मावळ तालुक्याचा निकाल ९७.४२ टक्के लागला आहे. मात्र, यंदा शहराच्या निकालात ०.६६ टक्क्यांची, तर मावळच्या निकालातही ०.८० टक्क्यांनी घट झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १९ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ९१२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यामधील १९ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची संख्या ९ हजार ९३० तर मुलींची संख्या ९ हजार ४४८ आहे. मावळ तालुक्यात ५ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ हजार ४३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मावळ तालुक्याचा एकूण निकाल ९७.४२ टक्के लागला आहे. यंदा मावळच्या निकालात ०.८० टक्क्यांनी घट झाली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांनीही यंदाच्या निकालात विशेष छाप पाडली. महापालिकेच्या १७ मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल ८८.५९ टक्के, तर ८ उर्दू माध्यमाच्या शाळांचा निकाल तब्बल ९७.८७ टक्के लागला. महापालिकेच्या २५ शाळांमधून २ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महापालिका शाळांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ९३ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ५८ विद्यार्थी असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या १७ तसेच २२ दिव्यांग विद्यार्थीही उत्तीर्ण झाले आहेत.
महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या निकालात घसरण, उर्दूची कामगिरी उंचावली
महापालिकेच्या शाळांचा २०२४-२५ या वर्षाचा निकाल ९३ टक्के व २०२३-२४ वर्षात ९५.३६ टक्के निकाल होता. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाच टक्क्यांनी निकाल घसरला आहे. यात माध्यमनिहाय महापालिकेच्या मराठी माध्यमाचा गतवर्षी ९३.८२ टक्के असलेला निकाल यावेळी थेट ८८.५९ टक्के आहे. उर्दू माध्यमाचा ९६.२ असलेला वाढ झाली असून, तो ९७.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
महापालिकेच्या शाळांनी यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी केलेले कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. - रवी लांडगे, महापौर.
Web Summary : Pimpri-Chinchwad's SSC result is 97.31%, Maval 97.42%, a slight dip from last year. Pimpri-Chinchwad Municipal schools excelled, with Urdu medium schools achieving 97.87%. Overall municipal school results saw a slight decrease.
Web Summary : पिंपरी-चिंचवड का एसएससी परिणाम 97.31%, मावल 97.42% रहा, जो पिछले साल की तुलना में थोड़ी गिरावट है। पिंपरी-चिंचवड नगर निगम के स्कूलों ने उत्कृष्ट प्रदर्शन किया, उर्दू माध्यम के स्कूलों ने 97.87% हासिल किया। कुल मिलाकर नगर निगम के स्कूल के परिणामों में थोड़ी गिरावट देखी गई।