ढाका येथील शे ए बंगाल राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यात मोठा गडबड घोटाळा दाखवणारे चित्र पाहायला मिळाले. ऑन-एअर झालेल्या एका चुकीमुळे होस्ट ब्रॉडकास्टर्सना चांगलीच नामुष्की ओढावली. सामना सुरू होताच ब्रॉडकास्टर्सने पाकिस्तान संघाच्या खेळाडूंची माहिती स्क्रीनवर दाखवली. मात्र, येथे मोठी चूक झाली. पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनऐवजी भारतीय संघातील खेळाडूंची नावे स्क्रीनवर झळकली. विशेष म्हणजे रोहित शर्माच नाव पाकिस्तानी कसोटी संघाच्या कर्णधाराच्या रुपात झळकलं. ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित कॅप्टन, पाकिस्तानचा संघात दिसला भारतीय खेळाडूंचा भरणा अन्...
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान दाखवण्यात आलेल्या चुकीच्या ग्राफिक्समध्ये रोहित शर्मासह शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांची नावे झळकवली. हा प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
बांगलादेश कर्णधाराचा मोठा पराक्रम अन् विक्रमी भागीदारी
बांगलादेशच्या संघाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. कर्णधार नझमुल होसेन शांतो याने आक्रमक शतकी खेळीसह संघाला संकटातून बाहेर काढले. शांतोने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२९ चेंडूत शतक साजरे केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे नववे शतक ठरले. बांगलादेशच्या शांतो आणि मोमीनुल हक या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी केली. पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी बांग्लादेशची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. तसेच पाकिस्तानविरुद्ध कसोटीत शतक करणारा शांतो हा बांग्लादेशचा पहिलाच कर्णधारही ठरला. या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बांगालदेशच्या संघाने पहिल्या डावात ४१३ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावात १ विकेटच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या होत्या.
Web Summary : A broadcasting blunder during the Pakistan vs. Bangladesh test match showed Indian players, including Rohit Sharma as captain, in Pakistan's lineup. Bangladesh's captain Shanto scored a century, leading his team to 413 runs. Pakistan responded with 179 for 1.
Web Summary : पाकिस्तान बनाम बांग्लादेश टेस्ट मैच के दौरान प्रसारण में हुई गड़बड़ी में रोहित शर्मा सहित भारतीय खिलाड़ी पाकिस्तान की टीम में दिखे। बांग्लादेश के कप्तान शांतो ने शतक बनाया, जिससे उनकी टीम 413 रन तक पहुंची। पाकिस्तान ने जवाब में 1 विकेट पर 179 रन बनाए।