शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 21:53 IST

NCP SP MP Supriya Sule Car Accident News: सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाला असून, सर्व जण सुखरूप असल्याचे म्हटले जात आहे.

NCP SP MP Supriya Sule Car Accident News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाल्याचे समजते. मुंबई आणि पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला असून, सुदैवाने या कारमधून प्रवास करणाऱ्या कोणालाही इजा झालेली नाही. सर्व जण सुखरूप असल्याची म्हटले जात आहे. 

अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. एकनाथ शिंदे कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी मुंबईहून मुरबाड येथे जाणार होते. मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने ते वळवून जुहू पवनहंस येथे आणून त्याचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली. यानंतर आता लगेचच सुप्रिया सुळे यांच्या अपघाताची माहिती समोर येत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात

खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट करत या अपघाताबाबत माहिती दिली आहे. पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत वाईट अनुभव आला; एका बेपर्वा चालकामुळे एका कारची माझ्या कारच्या बाजूला जोरदार धडक बसली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत. अशा घटना एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर होणारा अतिवेग आणि निष्काळजीपणा यामुळे असंख्य जीवांना धोका निर्माण होऊ शकतो. मी प्रत्येकाला आवाहन करतो की, त्यांनी सीट बेल्ट वापरावेत, सावध राहावे आणि जबाबदारीने वाहन चालवावे; जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील, असे सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या अपघातात सुप्रिया सुळे यांच्या गाडीचे थोडे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नुकतेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्ट लिंकचे लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबई पुणे महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत आणि अद्यापही होताना पाहायला मिळत आहेत. यात मोठी जीवितहानी झालेली पाहायला मिळालेली आहे. असे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. अनेक रत्ने या महामार्गावरील अपघातामुळे महाराष्ट्राने गमावलेली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule's car meets with accident on Mumbai-Pune Expressway.

Web Summary : NCP SP MP Supriya Sule's car met with an accident on the Mumbai-Pune Expressway. Fortunately, all passengers are safe and unharmed. More details are awaited.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेNCPराष्ट्रवादी काँग्रेस