शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
5
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
6
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
7
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
8
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
9
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
10
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
11
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
12
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
17
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
18
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
19
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:48 IST

यासंदर्भात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या टँकर्सने अमेरिकेची नाकेबंदी (Blockade) तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अमेरिकन सैनिकांनी यशस्वीपणे रोखला.

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिका-इराण यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता अमेरिकन सैनिकांनी इराणच्या दोन तेलवाहू टँकर्सवर हल्ला करून ती निकामी केली. यासंदर्भात 'एपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या भागात रात्रभर दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. यातच, संयुक्त अरब अमिरातीनेही (UAE) आपल्यावर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. या ताज्या घडामोडीने मध्यपूर्व आशियात पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न - 
यासंदर्भात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या टँकर्सने अमेरिकेची नाकेबंदी (Blockade) तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अमेरिकन सैनिकांनी यशस्वीपणे रोखला. यापूर्वी नौदलाच्या तीन जहाजांवरील हल्ले परतवून लावत अमेरिकेने होर्मुझमधील इराणी लष्करी तळांनाही प्रत्युत्तर दिले होते.

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्त हल्ला चढवला होता. तेव्हापासूनच इराणने जगाची ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा जलमार्ग (होर्मुझ समुद्रधुनी) बंद केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यातील अमेरिका-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, अमेरिकेने इराणी बंदरांना वेढा घातल नाकेबंदी केली आहे. 

या संघर्षावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले की, इराणने अमेरिकन हितांना आव्हान दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. तर दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेची ही कृती चिथावणीखोर आणि युद्धविरामाचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे सांगितले असले, तरी अणुकार्यक्रम आणि होर्मुझमधील वाहतुकीवरून निर्माण झालेला हा गतिरोध सध्या जगाची चिंता वाढवणारा ठरत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Strait of Hormuz: US strikes Iranian oil tankers, blockade intensifies.

Web Summary : Tensions escalate in the Strait of Hormuz as US forces attack Iranian oil tankers for allegedly breaking a blockade. Iran denies this, calling the action provocative. The situation raises fears of renewed conflict in the Middle East and global fuel price hikes.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणWarयुद्धIsraelइस्रायल