भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोडा यांना आज ईडीने अटक केली आहे. ईडीने आज सकाळी संजीव अरोडा यांच्या चंडीगड येथील सरकारी निवासस्थानावर धाड टाकली होती. अनेक तास चाललेल्या कारवाईनंतर ईडीने संजीव अरोडा यांना अटक केली आहे. तर राजकीय दबाव आणण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा आरोप आता आम आदमी पक्षाने केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिंग, फेमाचं उल्लंघन, जमिनीशी संबंधित प्रकरणे आणि संशयास्पद आर्थिक देवाणघेवाणीच्या चौकशीसाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने केवळ चंडीगडच नाही तर लुधियाना, जालंधर आणि गुरुग्राम शहरासह अनेक शहरांमध्ये धाडी टाकल्या आहेत. या कारवाईदरम्यान, संजीव अरोडा यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित कार्यालयेही चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर आम आदमी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार आणि इतर आर्थिक गैरव्यहरांच्या आरोपांखाली याआधीही आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, मनीष सिदोदिया यांच्यापासून ते आपचे इतर नेते आणि मंत्र्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई झालेली आहे.
Web Summary : Punjab Minister Sanjeev Arora was arrested by the ED following raids at his residence regarding money laundering and FEMA violations. AAP alleges political pressure behind the action, amidst previous actions against AAP leaders.
Web Summary : पंजाब के मंत्री संजीव अरोड़ा को ईडी ने मनी लॉन्ड्रिंग और फेमा उल्लंघन के मामले में उनके आवास पर छापेमारी के बाद गिरफ्तार किया। आप ने इस कार्रवाई के पीछे राजनीतिक दबाव का आरोप लगाया है, जबकि पहले भी आप नेताओं पर कार्रवाई हुई है।