शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:31 IST

ग्रेटर नोएडातील दादरीमध्ये एका २० वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेच्या हव्यासापोटी मोनिकाची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या २० वर्षांच्या मोनिका नागर या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, सासरच्या मंडळींनी घाईघाईने तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनिकाच्या माहेरच्या लोकांनी वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने, पोलिसांनी जळत्या चितेतून तिचा मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

सेक्टर 'जू' येथील रहिवासी असलेल्या मोनिकाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घोडी बछेडा गावातील अनुज चौहान याच्याशी कोर्ट मॅरेज केले होते. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला विरोध केला होता, मात्र नंतर ते मान्य झाले. पण लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच या नात्याचा असा भीषण अंत होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.

कोट्यवधींच्या मालमत्तेचा हव्यास?

मोनिकाच्या आईने, रेणू नागर यांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. रेणू यांच्या दाव्यानुसार, मोनिकाच्या नावावर सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता होती. लग्नानंतर सासरचे लोक ती मालमत्ता विकून पैसे आणण्यासाठी मोनिकावर सतत दबाव टाकत होते. मोनिकाने मालमत्ता विकण्यास नकार दिल्याने तिचे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आले आणि अखेर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप आईने केला आहे.

स्मशानभूमीत पोलिसांची धाड अन् आरोपींची पळापळ

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मोनिका आणि तिचा पती अनुज यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर मोनिका मृतावस्थेत आढळली. सासरच्या मंडळींनी तातडीने तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला. जेव्हा पोलीस आणि मोनिकाचे नातेवाईक तिथे पोहोचले, तेव्हा चितेने पेट घेतला होता. पोलिसांनी तातडीने जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला. हे पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

निक्की हत्याकांडाची आठवण ताजी

या घटनेने परिसरातील नागरिकांना २०२५ मधील गाजलेल्या 'निक्की हत्याकांडा'ची आठवण करून दिली आहे. त्या प्रकरणातही नवविवाहितेची जाळून हत्या करण्यात आली होती. एसीपी जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, "मृतदेहाचा काही भाग जळाला आहे, मात्र तो ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ७ मे रोजी मोनिकाने फोन करून आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितले होते, अशी तक्रार तिच्या आईने दिली आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Monica's Suspicious Death Before 3 Months of Love Marriage; Body Recovered.

Web Summary : In Greater Noida, Monica died suspiciously within three months of her marriage. Her family alleges murder due to property disputes. Police intervened during cremation, recovering the body for investigation, reminiscent of the Nikki murder case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश