शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:04 IST

इंटरनेट प्लॅटफॉर्मवर मुलांची एन्ट्री रोखण्यासाठी 'एज व्हेरिफिकेशन' सारखे कडक नियम आणले जात आहेत. मात्र....

सोशल मीडिया आणि विविध इंटरनेट प्लॅटफॉर्मवर लहान मुलांचा वावर रोखण्यासाठी जगभरात नियम कडक केले जात आहेत. अनेक प्लॅटफॉर्म्सनी 'एज व्हेरिफिकेशन' करण्यासाठी हायटेक सिस्टिम लावली आहे. मात्र, ही महागडी सिस्टिम लहान मुलांच्या 'देसी जुगाडा'समोर फेल ठरताना दिसत आहे. मुलं चक्क आपल्या चेहऱ्यावर दाढी-मिशी काढून वयाची खोटी माहिती देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१२ वर्षांचा मुलगा झाला १५ वर्षांचा!

एका पालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाने आयब्रो पेन्सिलच्या मदतीने स्वतःच्या चेहऱ्यावर मिशा काढल्या. जेव्हा त्याने एज व्हेरिफिकेशनसाठी कॅमेऱ्यासमोर चेहरा केला, तेव्हा एआय सिस्टिमने त्याला १२ ऐवजी १५ वर्षांचा तरुण समजून एक्सेस देऊन टाकला. ही केवळ एका मुलाची गोष्ट नसून, अनेक मुलं अशा प्रकारे सिस्टिमला फसवण्यात यशस्वी होत आहेत.

सिस्टिम बायपास करणे मुलांसाठी खेळ!

एका ताज्या अहवालानुसार, सुमारे ५३ टक्के मुलांना अलीकडच्या काळात एज व्हेरिफिकेशन करण्यास सांगण्यात आले होते. यापैकी ४६ टक्के मुलांचे असे मत आहे की, या सिस्टिमला चकवा देणे अत्यंत सोपे आहे. तर, एक तृतीयांश मुलांनी मान्य केले की, त्यांनी अशा क्लृप्त्या वापरून सिस्टिम बायपास केली आहे.

मुले वापरत असलेले इतर जुगाड!

बनावट जन्मतारीख: वयाचा आकडा वाढवून सांगणे.

दुसऱ्याची आयडी: घरातील मोठ्या व्यक्तीचे ओळखपत्र वापरणे.

व्हिपीएन : लोकेशन आणि ओळख लपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर.

पालकांचे डिव्हाइस: पालकांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून लॉग-इन करणे.

मोठ्यांचे फोटो: फेस स्कॅनिंगच्या वेळी घरातील मोठ्या व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवणे.

कंपन्यांसमोर दुहेरी संकट

मेटासारख्या कंपन्या आता वयाचा अंदाज लावण्यासाठी प्रगत एआय टूल्सचा वापर करत आहेत. काही प्लॅटफॉर्म फेस स्कॅन किंवा आयडी अपलोड करण्याची सक्ती करत आहेत. मात्र, यामध्ये प्रायव्हसीचा मोठा धोका आहे. तसेच, सिस्टिमने चुकीचा अंदाज लावल्यास खऱ्या युजर्सनाही त्रास होऊ शकतो. इंटरनेट जगतातील या 'चोर-पोलीस' खेळामुळे कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मुले त्यातून पळवाट शोधण्यात पटाईत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट वापराकडे अधिक लक्ष देणे आता काळाची गरज बनली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kids Outsmart Age Verification, Internet Companies Face Challenges.

Web Summary : Children are bypassing age verification on internet platforms using clever tricks like fake facial hair and stolen IDs. AI systems are being fooled, raising privacy concerns and creating headaches for internet companies. Parents urged to monitor children's online activity.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सSocial Mediaसोशल मीडिया