Yuvraj Singh viral video actress Navya Nair: केरळमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील दोन मोठे तारे एकत्र आले होते. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर आणि भारतीय क्रिकेटचा 'सिक्सर किंग' युवराज सिंग एकाच व्यासपीठावर असताना एका क्षणाने आणि अभिनेत्रीच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नव्या नायरने युवराज सिंगसोबत नेमके काय केले?
केरळमधील एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा नव्या नायर युवराज सिंगला भेटली, तेव्हा तिने अत्यंत विनम्रतेने त्याचे स्वागत केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नव्या नायर युवराज सिंगचा आदर करून त्याला वाकून नमस्कार करताना दिसली. ती त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसली. यावेळी या दोघांचे स्वागत करण्यासाठी पाकळ्या उडवण्यात आल्या. त्या पाकळ्या युवराजच्या खांद्यावर पडल्याचे पाहून ती हळूवार त्या पाकळ्या काढताना दिसली. इतकेच नव्हे तर नंतर तिने छान स्मितहास्य करत युवराजशी संवाद साधला आणि त्याच्याकडून काही बॅटवर स्वाक्षरीदेखील घेतल्या. या क्षणांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, सोशल मीडियावर चाहते व्हिडीओचे विविध अर्थ लावताना दिसत आहेत.
युवराज सिंगची प्रतिक्रिया
युवराज सिंगनेही नव्या नायरच्या या कृतीला तितक्याच आपुलकीने प्रतिसाद दिला. दोघांमधील हा सुसंवाद पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि विशेषतः केरळमध्ये पाहुण्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची मोठी परंपरा आहे. नव्या नायरने इतकी मोठी अभिनेत्री असूनही युवराजबद्दल जो आदर दाखवला, त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.हा कार्यक्रम केरळमधील एका प्रतिष्ठित ब्रँडशी संबंधित होता. युवराज सिंगच्या उपस्थितीमुळे तिथे उत्साहाचे वातावरण दिसून आले. त्यात नव्या नायरच्या या साध्या पण प्रभावी कृतीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
Web Summary : Actress Navya Nair greeted cricketer Yuvraj Singh respectfully at a Kerala event. Her humble gesture, including bowing and removing petals from his shoulder, won hearts. The interaction highlighted South India's tradition of respecting guests.
Web Summary : केरल में एक कार्यक्रम में अभिनेत्री नव्या नायर ने क्रिकेटर युवराज सिंह का सम्मानपूर्वक अभिवादन किया। उनके विनम्र हावभाव, जिसमें झुकना और उनके कंधे से पंखुड़ियों को हटाना शामिल था, ने दिल जीत लिया। इस बातचीत ने अतिथियों के सम्मान की दक्षिण भारत की परंपरा को उजागर किया।