MCX Share Price : मल्टी कमोडिटी एक्सचेंजसाठी (MCX) मार्चची तिमाही अत्यंत लाभदायी ठरली आहे. ८ मे रोजी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीनं आपले आर्थिक निकाल जाहीर केले असून, यामध्ये कंपनीच्या नफ्यात तब्बल २९१ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ५३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात १३५ कोटी रुपये होता.
महसूल आणि मार्जिनमध्ये मोठी झेप
केवळ नफाच नाही, तर कंपनीच्या महसुलातही प्रचंड वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत महसूल २०५ टक्क्यांनी वाढून ८८९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी हा आकडा २९० कोटी रुपये होता. कंपनीचा 'EBITDA' ६६७ कोटी रुपयांवर पोहोचला असून मार्जिन देखील ५५ टक्क्यांवरून वाढून ७४.८० टक्क्यांवर गेले आहे.
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
शेअरहोल्डर्ससाठी लाभांशाची घोषणा
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, कंपनीने २ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर ८ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या या लाभांशाला आगामी २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मंजुरी दिली जाईल. या निकालांचा सकारात्मक परिणाम ११ मे रोजी शेअरच्या किमतीवर दिसण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांची चांदी; ३ वर्षांत ९५०% परतावा
देशातील सर्वात मोठ्या कमोडिटी एक्सचेंजनं आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांत मालामाल केलं आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर १३३ टक्क्यांनी वधारला आहे. तर तीन वर्षांत या शेअरनं ९५० टक्के इतका जबरदस्त परतावा दिलाय. कंपनीचं मार्केट कॅप आता ७५,००० कोटी रुपयांवर पोहोचलंय. हे मूल्य बीएसईच्या (BSE) १.५९ लाख कोटींच्या मार्केट कॅपच्या निम्म आहे.
बाजारातील पडझडीतही MCX सावरला
८ मे रोजी जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली, तेव्हाही MCX चा शेअर १.७४ टक्क्यांच्या वाढीसह ३,०९७.१५ रुपयांवर बंद झाला. याच दिवशी निफ्टी १५० अंकांनी तर सेन्सेक्स ५१६ अंकांनी घसरला होता. २०२६ या वर्षात आतापर्यंत या शेअरनं सुमारे ४१ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : MCX's March quarter profit soared 291% to ₹530 crore. Revenue jumped 205%. Shareholders get ₹8 dividend. Share rose despite market fall, up 41% YTD. Strong performance expected on May 11.
Web Summary : एमसीएक्स का मार्च तिमाही का मुनाफा 291% बढ़कर ₹530 करोड़ हुआ। राजस्व 205% बढ़ा। शेयरधारकों को ₹8 का लाभांश। बाजार गिरावट के बावजूद शेयर में वृद्धि, साल-दर-साल 41% ऊपर। 11 मई को मजबूत प्रदर्शन की उम्मीद।