शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 14:29 IST

PM Modi Makhanlal Sarkar West Bengal Politics: ९८व्या वर्षीय माखनलाल सरकार यांच्या सन्मानानंतर पत्नी पुतूल सरकार भावनिक झाल्या

PM Modi Makhanlal Sarkar West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये आज भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला. सुवेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान एक रंजक घटना घडली. पंतप्रधान मोदी मंचावर येताच ते इतरांना भेटले, पण एका ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या मात्र ते आवर्जून पाया पडले. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सर्वात वयस्कर कार्यकर्त्याला आदराने वंदन केले. ते भाजपच्या स्थापनेपूर्वीपासूनच या संघटनेशी एकनिष्ठ व संबंधित आहेत. त्यांचे नाव माखनलाल सरकार. मोदी त्यांच्या पाया पडल्यानंतर, माखनलाल यांच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

माखनलाल सरकार यांची पत्नी काय म्हणाली?

शपथविधी सोहळ्याच्या मंचावर सन्मान मिळाल्यानंतर चर्चेत आलेल्या माखनलाल सरकार यांच्या कुटुंबीयांशी आज तकने संवाद साधला. माखनलाल सरकार यांच्या ७७ वर्षीय पत्नी पुतुल सरकार यांनी गदगदलेल्या आवाजात सांगितले, "मी खूप आनंदी आणि भावुक झाले आहे. माझ्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत असेलच. माझ्या पतीला इतका मोठा सन्मान मिळालेला पाहून खूप छान वाटले. ते अगदी सुरुवातीपासूनच पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांनी खूप मेहनत केली. लग्नानंतर जेव्हा मी त्यांच्यासोबत राहायला आले, तेव्हा मी त्यांना संघटनेसाठी तासन्तास काम करताना पाहिले आहे. ते अनेकदा कामासाठी पहाटेच घराबाहेर पडायचे. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निष्ठेने जोडलेले होते. ते सकाळी लवकर शाखेत जायचे. मग, मध्ये वेळ मिळाल्यास, ते नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी यायचे आणि मग पुन्हा कामासाठी निघून जायचे. आज जेव्हा मंचावर त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा सन्मान करण्यात आला, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला."

कोण आहेत माखनलाल सरकार?

९८ वर्षीय माखनलाल सरकार हे स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रवादी चळवळीत सहभागी झालेल्या सुरुवातीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपैकी एक मानले जातात. १९५२ मध्ये, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत सामील झाले होते. या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर, त्यांची पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांसाठी संघटन समन्वयक म्हणून नियुक्ती झाली. केवळ एका वर्षाच्या आत, त्यांनी पक्षात जवळपास १०,००० नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi Bows to Veteran; Wife Elated by Respect Shown

Web Summary : PM Modi bowed to veteran BJP worker Makhanlal Sarkar at a West Bengal event. Sarkar's wife expressed immense joy and pride, recalling his lifelong dedication to the RSS and party. He was jailed with Syama Prasad Mukherjee.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Narendra Modiनरेंद्र मोदीViral Videoव्हायरल व्हिडिओ