शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
5
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
6
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
7
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
8
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
9
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
10
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
11
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
12
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
13
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
14
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
15
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
16
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
17
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
18
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
19
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
20
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:30 IST

जालन्यात मनसे सैनिकांनी सदावर्तेंचा ताफा रोखला; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.

जालना: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जालन्यात मनसे सैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शनिवारी दुपारी सदावर्ते यांचा ताफा जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुलीजवळून जात असताना, दबा धरून बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर काळी शाई आणि ऑइल, सुपाऱ्या फेकून जोरदार निषेध नोंदवला.

नेमकी घटना काय?
ॲड. सदावर्ते हे शनिवारी जालना दौऱ्यावर असताना मानदेऊळगावकडे जात होते. छत्रपती संभाजीनगर चौफुलीजवळ त्यांच्या गाड्यांचा ताफा येताच मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर काळे ऑइल फेकले. राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेला सदावर्ते सातत्याने विरोध करत असल्याने, कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने हालचाली करत घोषणाबाजी करणाऱ्या काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS activists attack Adv. Gunratna Sadavarte's car in Jalna.

Web Summary : MNS activists in Jalna attacked Adv. Gunratna Sadavarte's car with black ink and oil to protest his criticism of Raj Thackeray. Police detained some MNS workers after the incident, which caused tension.
टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेMNSमनसेJalanaजालना