शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:51 IST

Tamil Nadu Politics: अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ११० जागा जिंकून इतिहास घडवला आहे. आता थोल थिरुमावलवन यांच्या व्हीसीके पक्षाने दिलेला बिनशर्त पाठिंबा विजय यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे.

तामिळनाडूच्याराजकारणात पाय ठेवतात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांचा पक्ष टीव्हीके यांनी आपली ताकद दाखवून दिली. पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या विजय यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली. मात्र, बहुमताचा आकडा थोडक्यात हुकल्याने सत्ता स्थापनेसाठी विलंब झाला. याच पार्श्वभूमीवर थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील व्हीसीके या पक्षाने टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे

सिनेजगतातून राजकारणात प्रवेश केल्यानंतर थलपती विजय यांच्या लोकप्रियतेची मोठी कसोटी या विधानसभा निवडणुकीत होती. टीव्हीके पक्षाने पहिल्यांदाच रिंगणात उतरून ११० जागा जिंकल्या आणि विरोधकांना मोठा धक्का दिला. तरीही, २३४ सदस्य संख्या असलेल्या तमिळनाडू विधानसभेत स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठता न आल्याने विजय यांना सत्ता स्थापनेसाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेवरून राजकीय तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर, थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. 

व्हीसीकेच्या या निर्णयामुळे थलपती विजय यांच्याकडे आता आवश्यक संख्याबळ गोळा झाले असून, त्यांनी सरकार स्थापनेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. या पाठिंब्यामुळे विजय यांना मोठे राजकीय बळ मिळाले असून, तमिळनाडूमध्ये आता एका नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच थलपती विजय राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. सुपरस्टार ते मुख्यमंत्री असा विजय यांचा हा प्रवास तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay's path cleared as VCK pledges unconditional support!

Web Summary : TVK's strong debut necessitates support. VCK's backing empowers Vijay to form government, marking a new era in Tamil Nadu politics. Victory imminent.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण