यंदाच्या आयपीएलमध्ये काही मोठे वादविवाद झाले नसले तरी काही किरकोळ वादांमुळे अनेक खेळाडू अडचणीत सापडत आहेत. पंजाब किंग्सचा आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहलही अशाच एका वादात सापडताना दिसत आहे. युझवेंद्र चहल सोशल मीडियावर वेब (ई सिगारेट) पित असतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या सत्यतेला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी त्यावरून एका वादाला तोंड फुटताना दिसत आहे. तसेच माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवारामाकृष्णन यांनी यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
युझवेंद्र चहल विमानात बसून वेप (ई सिगारेट) पिताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अर्शदीप सिंग याच्या पॉडकास्टशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओत युझवेंद्र चहल हा कथितपणे वेपचा वापर करताना दिसत आहे. तसेच कॅमेऱ्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हा व्हिडीओ खराआहे की खोटा याला दुजोरा मिळू शकलेला नाही. तसेच बीसीसीआयनेही त्याच्या सत्यतेला दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी या व्हिडीओबाबत परखड मत मांडलं आहे. भारतात वेपचा वापर करण्यावर बंदी आहे. जर कुणी तिचा वापर केला तर त्या व्यक्तीची तुरुंगात रवानगी झाली पाहिजे. जर अंमलबजावणीच झाली नाही तर कायदे करून काय उपयोग. ,सामन्यातील मानधनाच्या केवळ २५ टक्के दंड ही खूप लहान शिक्षा आहे. हाच गुन्हा जर सर्वसामान्यांनी केला असता तर त्यांना काय शिक्षा झाली असती, असा सवालही शिवरामाकृष्णन यांनी यावेळी विचारला.
Web Summary : Yuzvendra Chahal faces controversy after a video surfaced showing him allegedly vaping on a plane. Former cricketer Laxman Sivaramakrishnan strongly condemned the act, demanding strict punishment, including imprisonment, given the ban on vaping in India. He questioned lenient penalties for cricketers versus the public.
Web Summary : युजवेंद्र चहल का विमान में वेपिंग करते हुए एक वीडियो सामने आने के बाद विवाद हो रहा है। पूर्व क्रिकेटर लक्ष्मण शिवरामकृष्णन ने इस कृत्य की कड़ी निंदा की और भारत में वेपिंग पर प्रतिबंध को देखते हुए कारावास सहित सख्त सजा की मांग की। उन्होंने क्रिकेटरों के लिए हल्की सजा पर सवाल उठाया।