शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:37 IST

Vinesh Phogat Wrestling Dope Test: विनेश देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही, कारण काय?

Vinesh Phogat Wrestling Dope Test: भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) महिला कुस्तीपटूविनेश फोगट हिच्यावर गैरशिस्त आणि उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महासंघाने तिच्यावर २६ जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली आहे. नाट्यमय घडामोडींनंतर ती गेल्या वर्षी निवृत्तीतून माघार घेऊन कुस्तीत परतली होती. गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन कुस्ती स्पर्धेत ती सहभागी होणार होती. पण जवळपास १८ महिन्यांनंतर कुस्तीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विनेशच्या कारकिर्दीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

विनेश फोगटवर मोठी कारवाई

विनेशला देण्यात आलेल्या १५ पानी नोटीसमध्ये, भारतीय कुस्ती महासंघाने विनेशवर गंभीर आरोप केले आहेत. महासंघाचे म्हणणे आहे की, तिच्या वर्तनाने देशाची प्रतिमा डागाळली आहे आणि भारतीय कुस्तीला हानी पोहोचली आहे. तिने डब्ल्यूएफआयची घटना, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे आंतरराष्ट्रीय नियम आणि उत्तेजक-विरोधी तरतुदींचे उल्लंघन केले आहे. महासंघाने विनेशकडून चार आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे: २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी वजन कमी करण्याचे निकष पूर्ण न केल्यामुळे अपात्रता, उत्तेजक द्रव्य-विरोधी नियमांनुसार ठिकाणाबाबत चुका आणि मार्च २०२४ मध्ये झालेल्या निवड चाचण्यांमध्ये दोन वेगवेगळ्या वजन गटांमध्ये स्पर्धा करणे हे तिच्यावरील आरोप आहेत.

डब्ल्यूएफआयने (WFI) स्पष्टपणे सांगितले आहे की, निवृत्तीतून परतणाऱ्या खेळाडूंसाठी डब्ल्यूएफआयच्या उत्तेजक-विरोधी नियमांनुसार आवश्यक असलेला सहा महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे विनेश कोणत्याही देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. या बंदीमुळे ती १० ते १२ मे दरम्यान गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेतूनही बाहेर राहील, ती स्पर्धा विनेशची पुनरागमनाची स्पर्धा असणार होती. विनेश फोगाटला या नोटीशीवर प्रतिसाद देण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

यशस्वी जैस्वालवरही कारवाईची टांगती तलवार

विनेश फोगाटच्या व्यतिरिक्त, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) भारतीय संघाची युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि महिला संघाची युवा सलामीवीर शफाली वर्मा यांना डिसेंबरमध्ये चाचणीसाठी उपलब्ध नसल्याबद्दल नोटीस बजावली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे ‘वेअरअबाउट्स क्लॉज’चे (खेळाडू कुठे आहे हे कळवण्याच्या अटीचे) उल्लंघन मानले जात असून, यशस्वी आणि शफाली यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. नाडाने दोन्ही संघांना नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vinesh Phogat's wrestling comeback faces major setback due to ban.

Web Summary : Vinesh Phogat faces a ban until 2026 for disciplinary violations. The WFI issued a notice citing protocol breaches and anti-doping rules. Her planned comeback after 18 months is now jeopardized. Yashasvi Jaiswal and Shafali Verma also face notices.
टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीDrugsअमली पदार्थ