Vaibhav Suryavanshi World Record: क्रिकेट जगतातील वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याने अवघ्या १५ व्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं षटकारासह खाते उघडत टी-२० कारकिर्दीत षटकारांचे शतक साजरे केले. मोहम्मद सिराजच्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार मारत त्याने सर्वात जलदगतीने १०० षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. या एका षटकारासह त्याने किरॉन पोलार्डला मागे टाकले. एवढेच नाही तर २० वर्षांपेक्षा कमी वयात टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वंडर बॉय वैभव सूर्यवंशीनं मोडला पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० षटकार मारण्याचा विक्रम याआधी किरॉन पोलार्डच्या नावे होता. वेस्ट इंडिजच्या धाकड फलंदाजाने आपल्या टी-२० कारकिर्दीत ८४३ चेंडूंचा सामना केला होता. वैभव सूर्यवंशी याने फक्त ५१४ चेंडूत षटकारांचे 'शतक' साजरे केले.
KL राहुलचा विक्रमवीर अवतार! स्टायलिश बॅटरचा IPL मधील ‘हा’ रेकॉर्ड मोडणं जवळपास अशक्य
२० वर्षांपूर्वी सर्वाधिक टी-२० षटकार :
- वैभव सूर्यवंशी १००*
- रहमनुल्लाह गुरबाझ-९०
- डेवॉल्ड ब्रेविस -७३
- गुलसन झा-५३
- ईशान किशन – ५३
Web Summary : Vaibhav Suryavanshi, at 15, achieved a T20 record, smashing his 100th six while chasing a target. He broke Kiran Pollard's record for fastest 100 T20 sixes, achieving this in 514 balls. He's the first under-20 with 100 sixes.
Web Summary : महज 15 साल की उम्र में वैभव सूर्यवंशी ने टी20 क्रिकेट में इतिहास रचा, लक्ष्य का पीछा करते हुए अपना 100वां छक्का जड़ा। उन्होंने 514 गेंदों में सबसे तेज 100 टी20 छक्के मारकर किरण पोलार्ड का रिकॉर्ड तोड़ा। वह 20 साल से कम उम्र के पहले खिलाड़ी हैं जिनके 100 छक्के हैं।