शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेताना एजंटास रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:07 IST

- आकुर्डीच्या शाळेतील प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मुलीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलेल्या पालकाकडे ४० हजारांची लाच मागणाऱ्या एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि. ३० एप्रिल) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माउली गंगाराम जगताप (वय ३७, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे रंगेहात पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३० वर्षीय तक्रारदाराने मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च रोजी ऑनलाइन अर्ज भरला होता. २७ एप्रिल रोजी ते अर्जाच्या पडताळणीसाठी आकुर्डी येथील पडताळणी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांचा अर्ज बाद झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांची भेट संशयित माउली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदाराच्या मुलीच्या अर्जाची पडताळणी करून प्रवेशाची पावती मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने २९ एप्रिल रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, ३० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना माउली जगताप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, आसावरी शेंडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Agent caught red-handed taking bribe for RTE admission.

Web Summary : An agent was arrested in Pimpri for accepting a ₹40,000 bribe from a parent to secure their daughter's admission under the RTE Act. The Anti-Corruption Bureau (ACB) conducted the operation at a school in Akurdi, leading to the agent's arrest and a police case.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रakurdiआकुर्डीBribe Caseलाच प्रकरण