आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेताना एजंटास रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:07 IST2026-05-02T12:05:57+5:302026-05-02T12:07:30+5:30

- आकुर्डीच्या शाळेतील प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

pimpari-chinchwad bribe Case agent caught red-handed while taking bribe of Rs 40,000 for RTE admission | आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेताना एजंटास रंगेहात पकडले

आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेताना एजंटास रंगेहात पकडले

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मुलीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलेल्या पालकाकडे ४० हजारांची लाच मागणाऱ्या एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि. ३० एप्रिल) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माउली गंगाराम जगताप (वय ३७, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे रंगेहात पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३० वर्षीय तक्रारदाराने मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च रोजी ऑनलाइन अर्ज भरला होता. २७ एप्रिल रोजी ते अर्जाच्या पडताळणीसाठी आकुर्डी येथील पडताळणी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांचा अर्ज बाद झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांची भेट संशयित माउली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदाराच्या मुलीच्या अर्जाची पडताळणी करून प्रवेशाची पावती मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने २९ एप्रिल रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, ३० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना माउली जगताप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, आसावरी शेंडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : आरटीई दाखिले के लिए रिश्वत लेते एजेंट रंगे हाथों गिरफ्तार।

Web Summary : पिंपरी में आरटीई अधिनियम के तहत बेटी का दाखिला कराने के लिए एक अभिभावक से ₹40,000 की रिश्वत लेते हुए एक एजेंट को गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो (एसीबी) ने आकुर्डी के एक स्कूल में कार्रवाई की, जिसके परिणामस्वरूप एजेंट की गिरफ्तारी हुई।

Web Title : Agent caught red-handed taking bribe for RTE admission.

Web Summary : An agent was arrested in Pimpri for accepting a ₹40,000 bribe from a parent to secure their daughter's admission under the RTE Act. The Anti-Corruption Bureau (ACB) conducted the operation at a school in Akurdi, leading to the agent's arrest and a police case.