रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून; दापोडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 09:23 IST2023-03-20T09:22:35+5:302023-03-20T09:23:00+5:30

रिक्षात काहीजण बसल्यानंतर चालकाने त्यांना हटकल्यानंतर डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली

Murder of a rickshaw puller by hitting cement on his head Incident in Dapodi | रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून; दापोडीतील घटना

रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून; दापोडीतील घटना

पिंपरी : रिक्षात काहीजण बसलेले असताना रिक्षाचालकाने त्यांना हटकले. यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून केला. दापोडी येथील गणेशनगर येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

अलीम इस्माईल शेख (वय ४५, रा. कृष्णानगर, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी शेख यांची रिक्षा गणेशनगर येथे होती. या रिक्षात काहीजण बसलेले असताना शेख यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने रिक्षात बसलेल्या आरोपीने शेख यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Murder of a rickshaw puller by hitting cement on his head Incident in Dapodi