पिंपरीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 19:14 IST2018-09-28T19:13:47+5:302018-09-28T19:14:17+5:30
शिक्षकाकडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ही घटना सुसगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली.

पिंपरीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
पिंपरी : शिक्षकाकडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ही घटना सुसगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली. याप्रकरणी संतोष हरिभाऊ भेगडे (रा. घोटावडे) या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी यांची बारावर्षीय मुलगी सुसगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे. मुलगी तिच्या वर्गामध्ये मैत्रिणीसोबत बाकावर बसलेली होती. वर्गशिक्षक भेगडे त्याठिकाणी आला. त्याने तिच्या मैत्रिणीला बाकावरुन उठवून स्वत: त्याठिकाणी बसला. तसेच विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.