राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:05 IST2025-11-05T19:04:24+5:302025-11-05T19:05:01+5:30
मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट निशाणा साधला...

राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्येक प्रक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एनडीएच्या समर्थनार्थ बिहारच्या निवडणूक मैदानात जोरदार प्रचार करत आहेत. त्यांनी बुधवारी पश्चिम चंपारणच्या रामनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट निशाणा साधला.
जर घुसखोरांच्या मतांवर पंतप्रधान ह्वायची इच्छा असेल, तर... -
आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात हिमंता बिस्वा सरमा यांनी एसआयआरचा विरोध करण्यावरून राहुल गांधीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “जर तुम्हाला घुसखोरांच्या मतांवर पंतप्रधान ह्वायची इच्छा असेल, तर तुम्ही घुसखोरांसोबत बांग्लादेशात निघून जायला हवे.” यावेळी त्यांनी काँग्रेसवर देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचा आरोपही केला.
अशा लोकांनी पाकिस्तानात जावे - -
ओवैसींवर टीका करताना सरमा म्हणाले, “ते मुस्लीम मुख्यमंत्री बनवण्याची भाषा करतात, पण मुख्यमंत्री जनता निवडते, येथे तुमचे चालणार नाही. अशा विचारसरणीच्या लोकांनी पाकिस्तानात जावे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “राम आणि लक्ष्मण यांना पूजणारी व्यक्तीच बिहारची मुख्यमंत्री होईल.”
नीतीश सरकारचं कौतुक -
दरम्यान, सरमा यांनी नीतीश सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच आसाममधील बांग्लादेशी घुसखोरांनी बळकावलेल्या सुमारे एक लाख एकर जमिनीचा उल्लेख करत, “मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही त्यातील जवळपास अर्धी जमीन परत मिळवली आहे,” असेही सरमा यांनी यावेली सांगितले.