नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:59 IST2025-11-05T19:43:13+5:302025-11-05T19:59:43+5:30
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सिरीज "मनी हाइस्ट" पासून प्रेरित होऊन, दिल्लीतील तीन जणांनी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. अत्यंत धूर्त पद्धतीने, या टोळीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांची फसवणूक केली.

नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
नेटफ्लिक्सवरील "मनी हाइस्ट" या वेब सिरीज पाहून प्रेरित होऊन दिल्लीत तीन जणांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली. या तरुणांनी अतिशय हुशार पद्धतीने फसवणूक केली. दिल्लीच्या एका टोळीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांना फसवले. यामध्ये त्यांनी १५० कोटी रुपयांना गंडा घातला.
या टोळीतील सदस्यांनी त्यांची नावे बदलून "मनी हाइस्ट" या थ्रिलर सिरीजमधील पात्रेही ठेवली. या टोळीतील सदस्यांची ओळख अर्पित, प्रभात आणि अब्बास अशी झाली आहे. या सर्वांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
स्क्रीन नावांचा वापर
या टोळीने सोशल मीडियावर लोकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. वकील असलेल्या अर्पितने आपले नाव बदलून प्रोफेसर केले; संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवीधर असलेल्या प्रभात वाजपेयीने अमांडा हे नाव धारण केले, तर अब्बासने फ्रेडी हे नाव धारण केले. तिघांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी वेब सिरीजपासून प्रेरित स्क्रीन नावांचा वापर केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
डझनभर व्हॉट्सअॅप ग्रुप
आरोपींनी सोशल मीडियावर डझनभर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले. ते या ग्रुप्सचा वापर लोकांना शेअर बाजारातील माहिती पैसे गुतंवण्याचा सल्ला, सूचना देण्यासाठी करत होते. मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन ते लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन देत होते. सुरुवातीला, आरोपी कमी नफा देत असत आणि लोकांचा विश्वास संपादन करत असत. नंतर, कोणी मोठी रक्कम गुंतवण्याच्या आमिषाला बळी पडताच, आरोपी त्यांचे खाते ब्लॉक करत असत आणि पैसे हडप करत होते.
देशभरातील ३०० हून अधिक लोकांची फसवणूक
या टोळीने या पद्धतीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांची फसवणूक केली. त्यांनी या घोटाळ्याला बळी पडले आणि नफा पाहून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यांची खाती बंद झाली आणि त्यांचे पैसे लंपास झाले. टोळीतील सदस्य अनेकदा आलिशान हॉटेल्समध्ये राहत होते. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा वापर केला.