पतीनं पॉर्न व्हिडिओ पाहून पत्नीसोबत केलं अनैसर्गिक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:59 IST2021-09-21T19:59:17+5:302021-09-21T19:59:34+5:30

पतीसह सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

The husband did an unnatural act with his wife after watching a porn video | पतीनं पॉर्न व्हिडिओ पाहून पत्नीसोबत केलं अनैसर्गिक कृत्य

पतीनं पॉर्न व्हिडिओ पाहून पत्नीसोबत केलं अनैसर्गिक कृत्य

पिंपरी : लग्नात मानपान न करता सोनं दिलं नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. तसेच पॉर्न व्हिडिओ पाहून पतीनं विवाहितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना १७ मे २०१९ पासून वेळोवेळी घडली आहे.

याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. २०) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पतीसह सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात सोने दिले नाही. मानपान केला नाही. मुलगा दुबईला काम करतो त्याची कदर केली नाही, असं म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपी पतीने विवाहितेच्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ पाहून विवाहितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद केले.

Web Title: The husband did an unnatural act with his wife after watching a porn video