शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी आयटीपार्कमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उडवली दणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:10 IST

महाकाय होर्डिंग कोसळले, झाडे उन्मळून पडली ; सुदैवाने जीवित हानी टळली.

हिंजवडी : हिंजवडी, माण परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासाह अवकाळी पावसाने आयटीपार्क परिसरात अक्षरशः दाणादाण उडाली. फेज दोन मधील मुख्य रस्त्यालगत असलेले एक महाकाय होर्डिंग कोसळले, तर माण मध्ये झाड उन्मळून पडले. दोन्ही घटनांमध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हिंजवडी, माण परिसरात सोमवारी (दि.२२) दुपारी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आयटीपार्क परिसरात अनेक फ्लेक्स फाटले, फेज दोन मधील मुख्य रस्त्यावर विप्रो सर्कल जवळ महाकाय होर्डिंग कोसळल्याने त्याखाली एक चारचाकी आणि अनेक दुचाकी अडकून पडल्या होत्या. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे परिसरातील  वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मोठा आवाज झाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मण बोडके, निखिल बोडके, रवींद्र बोडके, स्वप्नील बोडके यांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली, तसेच अडकलेल्या दुचाकी बाहेर काढण्यासाठी मदत केली. दुसऱ्या घटनेत वादळी वाऱ्यामुळे माण रस्त्यावर भरणे वस्ती जवळ एक झाड उन्मळून पडले. नवनाथ पारखी, हाणमंत पारखी, संदीप पारखी, शरद बाराहाते यासह स्थानिक तरुणांनी प्रसंगवधान दाखवत झाड बाजूला केले.

दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जनावरांचा चारा भिजला, परिसरात अनेक ठिकाणी गहू, ज्वारी काढणी हंगाम सुरु आहे. धान्य भिजल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या घटनेमुळे आयटीनगरी परिसरातील अनधिकृत महाकाय होर्डिंगचा मुद्दा, पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीRainपाऊसITमाहिती तंत्रज्ञान