Power Outage: उन्हाचा तडाखा आणि भोसरीत वारंवार वीज खंडित; नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:26 IST2026-04-17T16:25:51+5:302026-04-17T16:26:25+5:30

Bhosari Power Outage: गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

Heatwave and frequent power outages in Bhosari; Citizens' plight | Power Outage: उन्हाचा तडाखा आणि भोसरीत वारंवार वीज खंडित; नागरिकांचे हाल

Power Outage: उन्हाचा तडाखा आणि भोसरीत वारंवार वीज खंडित; नागरिकांचे हाल

भोसरी : परिसरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जयदीप पार्क येथील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाडामुळे खंडोबा माळ, जयदीप पार्क, दिघी रस्ता तसेच दिघीमधील आदर्शनगर या भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. कधी केबल नादुरुस्त होणे, तर कधी फिडरमध्ये बिघाड होणे, अशा कारणांमुळे दिवसातून अनेक वेळा वीज जयदीप पार्क येथील रोहित्र बिघाडामुळे खंडोबा माळ, दिघी रस्ता व आदर्शनगर परिसर अंधारात जात आहे. त्यामुळे उकाड्याच्या तीव्रतेत भर पडत आहे.

विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ निश्चित नसून कधी दिवसा तर कधी मध्यरात्रीही अचानक वीज जाते. दि. १५ एप्रिलच्या रात्रीदेखील अचानक वीज खंडित झाली होती. काही वेळानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला, मात्र लगेचच विद्युत दाब वाढल्याने पुन्हा खंडित झाली. या प्रकारामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी असून, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.

तत्काळ उपाययोजना करा

विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा निश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी तासन्तास खंडीत होणारा वीजपुरवठा बंद करावा, मागणी आहे.

जयदीप पार्क येथील रोहित्रात बिघाड झाल्याने नादुरुस्त झाला होता. बिघाड झालेले रोहित्र बदलून नवीन बसविण्याचे काम सुरू आहे. काम संपल्यावर वीज पूर्ववत सुरू करून समस्या सोडवली जाईल.  राजेश घोडे, सहायक अभियंता, महावितरण, भोसरी
 
रात्री-बेरात्री कधीही वीज जाते. फोन केल्यावर पंधरा मिनिटात येईल, म्हणून सांगण्यात येते, मात्र तासभर येत नाही. उन्हाळ्यात वीज जाण्याचे प्रमाण वाढले असून, सकाळी पाणी येण्याच्या वेळेत सुद्धा वीज नसते.  - संतोष मुळे, खंडोबा माळ, भोसरी

Web Title : भीषण गर्मी में बार-बार बिजली कटौती से भोसरी के निवासी परेशान

Web Summary : खराब ट्रांसफार्मर के कारण भोसरी के खंडोबा माल और दिघी इलाकों में बार-बार बिजली गुल होने से निवासी परेशान हैं। अनियमित बिजली कटौती से दैनिक जीवन बाधित है और उपकरण क्षतिग्रस्त हो रहे हैं। निवासियों ने भीषण गर्मी में महावितरण से स्थायी समाधान की मांग की है।

Web Title : Bhosari Residents Suffer as Heatwave Causes Frequent Power Outages

Web Summary : Bhosari residents are facing frequent power outages due to a faulty transformer, especially in Khandoba Mal and Dighi areas. The outages, occurring randomly, disrupt daily life and damage appliances. Residents demand a permanent solution from Mahavitaran to address the issue, particularly during the heatwave.