Pune Lift Accident: ६ अन् ७ मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; तरुणाला बाहेर काढताना थेट खाली कोसळली, तरुणाचा अंत, ११ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:03 IST2026-03-30T16:01:45+5:302026-03-30T16:03:00+5:30

Nisarga Society Lift Accident Youth Died: भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला सोसायटीच्या कमिटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

Elevator stuck between 6th and 7th floors; While taking out a young man, it fell straight down, the young man died, 11 people were charged | Pune Lift Accident: ६ अन् ७ मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; तरुणाला बाहेर काढताना थेट खाली कोसळली, तरुणाचा अंत, ११ जणांवर गुन्हा

Pune Lift Accident: ६ अन् ७ मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; तरुणाला बाहेर काढताना थेट खाली कोसळली, तरुणाचा अंत, ११ जणांवर गुन्हा

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण संस्थेची लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह ११ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश सुरंगे असे अपघातातमृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश रामा सुरंगे (वय ३२, किनळे, हवेली) यांनी शनिवारी (२८ मार्च) रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक हिंदराव वारके (वय ४४), दीपक अशोक हेंद्रे, विनायक बाबुराव खोराटे, नीलेश बाळू गवळी, प्रवीण श्रीवास, सचिन बापू शिर्के, प्रांजली सर्वेश पिंगळे, धनश्री योगेश वैद्य, वैशाली जितेंद्र बोरकर, रामभाऊ किसन साबळे, संतोष सहादू आसवले (सर्व रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीचा भाऊ दिनेश सुरंगे लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना लिफ्टचा रोप (दोरी) तुटल्याने लिफ्ट थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला सोसायटीच्या कमिटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title : पिंपरी चिंचवड: लिफ्ट दुर्घटना में युवक की मौत; लापरवाही का मामला दर्ज

Web Summary : पिंपरी चिंचवड में लिफ्ट खराब होने और दुर्घटनाग्रस्त होने से एक युवक की मौत हो गई। कथित रखरखाव की कमी के कारण हुई घातक दुर्घटना के लिए 11 सोसायटी सदस्यों के खिलाफ लापरवाही का मामला दर्ज किया गया है।

Web Title : Pimpri Chinchwad: Lift Accident Kills Youth; Negligence Case Filed

Web Summary : In Pimpri Chinchwad, a youth died after a lift malfunctioned and crashed. A negligence case has been filed against 11 society members for alleged lack of maintenance, leading to the fatal accident.