पिंपरी : आकुर्डी स्टेशन आणि वाल्हेकरवाडी परिसरात शनिवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत वीज बंद राहिल्याने घरगुती कामे, पाणीपुरवठा आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. महावितरणकडून २२ केव्ही देहूरोड वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा थांबवण्यात आला होता. या बंदमुळे आकुर्डी स्टेशन, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी परिसरातील अनेक भाग प्रभावित झाले.
रेल विहार, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, जिजामाता चौक, शुभारंभ कॉलनी, हरिओम कॉलनी, नागसेन नगर, चिंतामणी चौक, साईराज कॉलनी, दगडोबा चौक, तुकाराम नगर, वाल्हेकरवाडी गावठाण, शिवाजी पार्क, नंदनवन कॉलनी, सप्तश्री सोसायटी आदी भागांत दिवसभर वीजपुरवठा बंद राहिला.
वीज नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवला. उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना विशेष त्रास सहन करावा लागला. महावितरणकडून नियोजित बंदबाबत नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक घरमालकांनी भाडेकरूंना याची माहिती न दिल्याने कामगार आणि नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसला.
आज सकाळपासून लाइट नसल्याने लहान मुले, वृद्धांना उकाड्याचा त्रास झाला. लाइट बंद राहणार असल्याचे मेसेज देण्यात आले पाहिजेत. - सीमा रायते, स्वामी विवेकानंद सोसायटी, वाल्हेकरवाडी.
महावितरणकडून २२ केव्ही देहूरोड वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वीज पुरवठा दुपारी ४ नंतर पूर्ववत करण्यात आला. ग्राहकांना काही तक्रार असल्यास महावितरणला संपर्क साधावा.- शीतल मेश्राम, महावितरण अधिकारी.
Web Summary : Residents of Akurdi Station and Walhekarwadi faced a day-long power outage on Saturday due to maintenance work. The power cut disrupted daily life, causing water shortages and hardship, especially for children and the elderly, amidst the heat. Power was restored after 4 PM.
Web Summary : आकुर्डी स्टेशन और वाल्हेकरवाड़ी के निवासियों को रखरखाव के काम के कारण शनिवार को दिन भर बिजली कटौती का सामना करना पड़ा। बिजली कटौती से दैनिक जीवन बाधित हुआ, पानी की कमी हुई और गर्मी के बीच, खासकर बच्चों और बुजुर्गों को कठिनाई हुई। शाम 4 बजे के बाद बिजली बहाल हुई।