शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

५२ कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना प्रकरण : प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:46 IST

मुख्य लेखा व वित्त संचालक यांच्या भूमिकेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी : महापालिकेच्या लेखा व वित्त विभागात उघडकीस आलेल्या तब्बल ५२ कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना प्रकरणात आता मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल तयार झाला असून, मुख्य लेखा व वित्त संचालक यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्यापही गुलदस्त्यात ठेवला आहे.

५२ कोट महापालिकेतील आर्थिक शिस्तीला धक्का देणाऱ्या या प्रकरणात बोगस उपसूचनांच्या माध्यमातून ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर देयके अदा करण्यात आल्याचे समोर आले होते. प्राथमिक तपासणीत अनेक अनियमितता आढळून आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम या समितीकडून करण्यात आले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समितीचा अहवाल आता प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असून, त्यात काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.'चौकशी अहवाल तयार, पण निर्णय कुठे आहे?' ५२ कोटींचा धक्का बसल्यानंतरही प्रशासनाची गती मंदावलेली दिसते. चौकशी अहवाल तयार असूनही तो केवळ फाईलमध्येच राहणार का, की खरोखर दोर्षीवर कारवाई होणार, हा खरा प्रश्न आहे. "मोठे मासे" वाचवण्यासाठी निर्णय लांबवला जातोय का, अशी कुजबुज सुरू झाली आहे. आता तरी प्रशासनाने धाडस दाखवून पारदर्शक भूमिका घेतली, तरच नागरिकांचा विश्वास टिकेल.विशेषतः मुख्य लेखा व वित्त संचालक यांच्या भूमिकेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : 52 Crore Bogus Sub-Clause Case: Criminal Action Against Praveen Jain?

Web Summary : A probe into a 52 crore bogus sub-clause scam implicates a finance director. A report suggests criminal charges. Action is awaited.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र