Crime News: चहाच्या बिलावरून टपरी चालकाला मारहाण;आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 15:46 IST2026-04-26T15:46:13+5:302026-04-26T15:46:35+5:30

- याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.

Crime News Nadla gets caught in the police net over a stall bill | Crime News: चहाच्या बिलावरून टपरी चालकाला मारहाण;आरोपी अटकेत

Crime News: चहाच्या बिलावरून टपरी चालकाला मारहाण;आरोपी अटकेत

पिंपरी : चहाचे अवघे ४५ रुपयांचे बिल देण्यावरून टपरी चालकाला नडला. त्यास आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. मात्र, पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल मिळून आले. ही घटना ताथवडे येथे शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) घडली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.


महेश गंगाधर साळवे (वय २६, रा. मुंजोबानगर, वाकड) असे अटक केलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. टपरीचालकाला मारहाण केल्याप्रकरणी महेश साळवे याच्या दोन साथीदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी पहाटे पाचच्या सुमारास ताथवडे येथील डिकॅथलॉनसमोरील टपरीवर संशयित साथीदारांसह आला होता. त्याने नाश्ता आणि चहा घेतल्यानंतर टपरीवरील आचारी अनिल काशीनाथ काळगे (वय २५, रा. रहाटणी) यांनी ४५ रुपयांचे बिल मागितले. यावरून संतापलेल्या साळवे व त्याच्या साथीदारांनी काळगे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर टपरीवरील कांदा कापण्याचा लाकडी ठोकळा डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.

Web Title : चाय के बिल पर मारपीट: दुकानदार की पिटाई, आरोपी पिस्तौल के साथ गिरफ्तार।

Web Summary : पिंपरी: चाय के 45 रुपये के बिल पर एक चाय की दुकान के मालिक की पिटाई की गई। पुलिस ने महेश साल्वे को गिरफ्तार किया, जिसके पास से एक अवैध पिस्तौल मिली। ताथवडे में मारपीट के लिए दो साथियों पर भी मामला दर्ज।

Web Title : Tea bill fight: Shop owner beaten, accused arrested with pistol.

Web Summary : Pimpri: A tea stall owner was beaten over a ₹45 bill. Police arrested Mahesh Salve, finding an illegal pistol. Two accomplices are also booked for assault in Tathawade.