लाथाबुक्के, दांडके आणि दगड...; प्रेमाच्या संशयातून तरुणाला अमानुष मारहाण;चौघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 17:15 IST2026-05-13T17:14:51+5:302026-05-13T17:15:34+5:30

Crime News : या मारहाणीत शुभम जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Crime News Kicks, sticks and stones...; Young man brutally beaten on suspicion of love; Crime against four | लाथाबुक्के, दांडके आणि दगड...; प्रेमाच्या संशयातून तरुणाला अमानुष मारहाण;चौघांविरोधात गुन्हा

लाथाबुक्के, दांडके आणि दगड...; प्रेमाच्या संशयातून तरुणाला अमानुष मारहाण;चौघांविरोधात गुन्हा

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा चक्रपाणी वसाहतीत ही घटना घडली असून याप्रकरणी भोसरी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शुभम भगवान दुतोंडे (वय २२) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील असून सध्या भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ११:४० वाजण्याच्या सुमारास शुभम हे त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी बंटी गायकवाड, सुमित शिंदे, पप्पू गायकवाड आणि आदित्य सावद हे तेथे आले. एका तरुणीसोबत शुभमचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून त्यांनी शुभमला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच आरोपींनी दांडक्याने आणि परिसरातील दगड उचलून शुभमवर हल्ला केला. या मारहाणीत शुभम जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौघांविरोधात मारहाण व दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title : ईर्ष्या में क्रूर हमला: युवक की पिटाई; चार पर मामला दर्ज।

Web Summary : भोसरी में प्रेम संबंध के शक में एक युवक की बेरहमी से पिटाई की गई। भोसरी पुलिस ने लाठी और पत्थरों से हमला करने के आरोप में चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, जिससे चोटें आईं और स्थानीय तनाव हुआ। जांच जारी है।

Web Title : Jealousy fuels brutal assault: Young man beaten; Four booked.

Web Summary : In Bhosari, a young man was brutally beaten due to suspicion of a love affair. Four individuals have been booked by Bhosari police for assault using sticks and stones, causing injuries and local tension. Investigation underway.