एक तरुण अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला; तारेवरची कसरत, अखेर अग्निशमन दलाने वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 19:31 IST2026-04-28T19:30:26+5:302026-04-28T19:31:07+5:30

नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

A young man climbed a high-voltage power line tower; his life was saved by the fire brigade after a struggle on the wire. | एक तरुण अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला; तारेवरची कसरत, अखेर अग्निशमन दलाने वाचवले प्राण

एक तरुण अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला; तारेवरची कसरत, अखेर अग्निशमन दलाने वाचवले प्राण

पिंपरी : निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी रात्री ९.१५ला एक तरुण अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला. त्याला वाचविण्यासाठी ५५ मीटरची 'ब्रांटो स्काय लिफ्ट' मागविण्यात आली. ब्रांटो स्काय लिफ्ट आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी  रेस्क्यू ऑपरेशन राबवित तरुणाचे जीव वाचविले. 

निगडीतील यमुनानगर परिसरात सोमवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या एक तरुण टॉवरवर चढला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान संबंधित इसम टॉवरच्या शिखरावर उभा राहून तारेवर कसरत करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तातडीने ५५ मीटर उंचीची ब्रांटो स्काय लिफ्ट मागवून बचावकार्य सुरू केले. रेस्क्यूदरम्यान संबंधित इसमाने टॉवरवरील अर्थिंग वायरचा जॉइंटखाली फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडस आणि कौशल्य दाखवत बचावकार्य केले. प्रारंभी चालक आणि यंत्रचालक दीपक ढवळे यांनी टॉवरखाली जंपिंग शीट व ताडपत्री लावून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना केली. त्यानंतर लिडिंग फायरमन विकास नाईक यांनी टॉवरवर चढून इसमाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर फायरमन सचिन ठोसरे यांनी त्यांना सहकार्य केले. यानंतर सह अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले आणि अनिल माने यांनीही टॉवरवर चढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. दुसऱ्या बाजूने ब्रांटो स्काय लिफ्टच्या सहाय्याने ऋषिकांत चिपाडे, अमोल चिपळूणकर आणि नाथा शिंदे यांनी बचावकार्य सुरू ठेवले. ब्रांटो ऑपरेशन अमोल चिपळूणकर आणि रुपेश जाधव यांनी यशस्वीरीत्या हाताळले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित इसमाला सुरक्षितपणे पकडून ब्रांटो केजमध्ये घेतले आणि सुखरूप खाली आणले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. 

नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. हाय टेन्शन वीजवाहिन्या, टॉवर्स किंवा इतर धोकादायक ठिकाणी जाणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक बाब आढळल्यास तात्काळ महानगरपालिका किंवा पोलिस प्रशासनाला कळवावे. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त

अशा प्रकारच्या घटनांमध्ये बचावकार्य करताना अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहते. नागरिकांनी अशा धोकादायक कृती टाळून प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः हाय टेन्शन टॉवर्स, उंच इमारती किंवा प्रतिबंधित ठिकाणी जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ माहिती दिल्यास जलद आणि प्रभावी मदत पोहोचवणे शक्य होते. - व्यंकटेश दुर्वास, उप आयुक्त, अग्निशमन विभाग

Web Title : युवक ऊंचे बिजली के टॉवर पर चढ़ा, दमकल विभाग ने बचाया

Web Summary : पिंपरी के निगडी में एक युवक ऊंचे बिजली के टॉवर पर चढ़ गया। दमकल कर्मियों ने 55 मीटर की ब्रांटो स्काईलिफ्ट का उपयोग करके उसे बचाया, जिससे एक संभावित त्रासदी टल गई। युवक को पुलिस हिरासत में ले लिया गया।

Web Title : Youth Climbs High-Voltage Tower, Rescued by Fire Department in Pimpri.

Web Summary : A youth climbed a high-voltage tower in Nigdi, Pimpri. Firefighters rescued him using a 55-meter Bronto Skylift, preventing a potential tragedy. The youth was taken into police custody.