६-७ वर्षांचा मुलगा रिक्षा चालवतोय; वडील पाय वर करून मागे बसले, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:09 IST2026-04-23T13:08:45+5:302026-04-23T13:09:50+5:30

धक्कादायक बाब म्हणजे वडील रिक्षाच्या मागील सीटवर बसून प्रवास करताना दिसत आहेत. मुलाच्या हातात वाहन देऊन त्याच्या तसेच इतरांच्या जीवाशी खेळ केला जात आहे

A 6-7 year old boy is driving a rickshaw; his father sits in the back with his legs up, a shocking incident in Pimpri-Chinchwad! | ६-७ वर्षांचा मुलगा रिक्षा चालवतोय; वडील पाय वर करून मागे बसले, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार!

६-७ वर्षांचा मुलगा रिक्षा चालवतोय; वडील पाय वर करून मागे बसले, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार!

पुणे: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड परिसरातील फिनिक्स मॉलसमोरील मुख्य रस्त्यावर अवघा सहा ते सात वर्षांचा चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व व्हायरल होत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, हा लहान मुलगा रिक्षाचे स्टेअरिंग हाताळत मुख्य रस्त्यावर वाहन चालवत आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, त्याचे वडील रिक्षाच्या मागील सीटवर बसून प्रवास करताना दिसत आहेत. मुलाच्या हातात वाहन देऊन त्याच्या तसेच इतरांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ही घटना अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर घडल्याने  अपघाताचा धोका अधिक होता. जर एखादा अपघात घडला असता, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असती, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पालकांची बेजबाबदारी आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संताप व्यक्त होत आहे.

तसेच, एवढ्या लहान मुलाकडून मुख्य रस्त्यावर वाहन चालवले जात असताना वाहतूक पोलिसांचे लक्ष का गेले नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि अंमलबजावणीवरही या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास सक्त मनाई आहे. अशा प्रकारांमध्ये संबंधित पालकांवर कडक कारवाई होऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात अशा घटना वारंवार घडताना दिसत असल्याने नियमांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, संबंधित पालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title : बच्चा चला रहा रिक्शा, पिता पीछे: पिंपरी-चिंचवड में चौंकाने वाला मामला!

Web Summary : पिंपरी-चिंचवड में एक चौंकाने वाला वीडियो सामने आया है जिसमें एक बच्चा ऑटो-रिक्शा चला रहा है, जबकि उसके पिता पीछे बैठे हैं। नागरिकों ने माता-पिता की गैरजिम्मेदारी पर आक्रोश व्यक्त किया और सख्त कार्रवाई की मांग की, यातायात पुलिस की लापरवाही पर सवाल उठाया। कानूनों के प्रभावी प्रवर्तन का आग्रह किया गया है।

Web Title : Child Drives Rickshaw, Father Relaxing Behind: Pimpri-Chinchwad Shocks!

Web Summary : A shocking video shows a young boy driving an auto-rickshaw in Pimpri-Chinchwad while his father sits in the back. Citizens express outrage over the parents' irresponsibility and demand strict action, questioning traffic police negligence. Effective enforcement of laws is urged to prevent recurrence.