चर्चा तर होणारच... रॉजर फेडररला झापणारी 'अंपायर' दिसतेच एवढी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 03:59 PM2020-01-28T15:59:41+5:302020-01-28T16:03:18+5:30

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत आणखी एका पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात बाजी मारली.

सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या 38 वर्षीय फेडररनं पुन्हा एकदा आपल्या अनुभवाच्या जोरावर 28 वर्षीय टेन्नीस सँडग्रेनला हार मानण्यास भाग पाडले.

1-2 अशा पिछाडीवरून फेडररनं हा सामना 6-3, 2-6, 2-6, 7-6 ( 10-8), 6-3 असा जिंकला. फेडररनं 3 तास 31 मिनिटांत हा सामना जिंकला.

पण, या सामन्यात फेडररच्या मॅच इतकीच चेअर अंपायर असलेल्या महिलेनं सर्वांचे लक्ष वेधले. सर्बियाची मरिआना वेल्जोव्हिच या सामन्यात चेअर अंपायर होती. सामना सुरू असताना तिनं फेडररला ताकीद दिली होती.

फेडररला ताकीद देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, वेल्जोव्हिचबाबत जाणून घेण्यासाठी नेटिझन्सनी गुगल सर्चवर उड्या मारल्या.

सामन्यादरम्यान फेडररनं प्रतिस्पर्धीला अपशब्द वापरले होते. तेव्हा चेअर अंपायरनं त्याला ताकीद दिली. वेल्जोव्हिचनं 2015 साली अंपायरिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.