सावधान! गुगल सर्चमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात; व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वापरत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:10 PM2020-02-27T15:10:29+5:302020-02-27T15:17:54+5:30

सध्या सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलं आहे, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपने सगळ्यांवरच भूरळ घातली आहे.

सध्या जगभरात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे, एकाच वेळी अडीशचे लोकांशी ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेक जण एकमेकांशी सहज बोलू शकतात.

जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुमचे फोटो, व्हिडिओ, चॅट्स कोणीही पाहू आणि वाचू शकतं. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या गोपनीयतेस मोठा धोका असल्याचं समोर आलं आहे. कारण एका गुगल सर्चद्वारे याचे सहज एक्सेस मिळू शकतो,

तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबाच्या सदस्यांशी काय बोलता, यावर कोणताही अज्ञात व्यक्ती नजर ठेऊ शकतो. हा संपूर्ण प्रकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप Invite लिंकचा आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक वैशिष्ट्य आहे ज्यामुळे कोणत्याही ग्रुपचा सदस्य होण्यासाठी तुम्हाला लिंक पाठवली जाते. ही लिंक केवळ ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यास मर्यादित असल्यास ते सुरक्षित आहे.

पण कोणत्या चुकीच्या वेबसाईट्सवरुन ही लिंक शेअर केली असेल तर तुमच्या प्रायव्हेसीला धोका आहे. कारण गुगलवर अशा अनेक ग्रुपच्या लिंक आहेत ज्यामुळे तुमच्या ग्रुपमध्ये कोणीही सहज प्रवेश करेल.

गूगल Invite to Group via Link ची URL तयार करतो. गुगल सर्चद्वारे कोणीही ही URL बनवू शकतं. ग्रुप चॅट लिंक बेस URL चा उपयोग केला जातो.

अन्य वेबसाइट्सवर व्हॉट्सअ‍ॅप लिंक शेअर केल्यामुळे ती गुगल सर्चमध्येही दिसते. यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एक अज्ञात व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे ग्रुप मेंबरचे फोन नंबर, नावे ग्रुप चॅट्स त्याला उपलब्ध होते.

मात्र यामध्ये एक चांगली बाब आहे की, ग्रुपमध्ये सहभागी झालेला व्यक्ती मागील चॅट पाहू शकत नाही. गुगल व इतर सर्च इंजिनवरील ग्रुप चॅट्सच्या गोपनीयतेचा धोका असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपला माहित आहे.

कंपनीने असं म्हटले आहे की यात दोष नाही, ज्या पद्धतीने त्याने काम केले पाहिजे तसं करतोय पण दुसरीकडे, जगभरातील युजर्स काही दिवसांपासून सोशल मीडियावर या त्रुटीबद्दल बोलत आहेत.

यासंदर्भात व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्व कॉन्टेंट्सप्रमाणे ज्या Invite लिंक्स इंटरनेटवर पोस्ट केल्या जातात. ते सर्च होतात. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडला गेल्यास त्याची सूचना युजर्सना मिळते. त्यामुळे एखादा अज्ञात व्यक्ती ग्रुपमध्ये सहभागी झाला तर त्याबाबत युजर्स सतर्क होऊ शकतात.