Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 08:32 AM2024-04-30T08:32:54+5:302024-04-30T08:40:52+5:30

Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन यांच्या नावावर तीन गाड्या आहेत, ज्यामध्ये अर्बानिया, ह्युंदाई आय-20 आणि मारुती एक्सएल सिक्स यांचा समावेश आहे.

झारखंडच्या गांडेय विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री चंपाई सोरेनही उपस्थित होते.

कल्पना सोरेन यांनी आपल्या नामांकनात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्या करोडपती आहे. कल्पना सोरेन यांच्याकडे एकूण 19.14 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 13 कोटी 63 लाख 10 हजार रुपयांची स्थावर संपत्ती आहे.

कल्पना सोरेन यांच्याकडे रोख रक्कम, कार विमा, पीपीएफ, बँक ठेवी आणि दागिन्यांसह 5 कोटी 51 लाख 51 हजार 168 रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय, कल्पना सोरेन यांच्यावर 3.67 कोटी रुपयांचे कर्ज आहे. याचबरोर, कल्पना सोरेन यांचे पती हेमंत सोरेन हे देखील करोडपती आहेत.

हेमंत सोरेन यांच्याकडे 5.3 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. कल्पना सोरेन यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही सर्व माहिती दिली आहे. प्रतिज्ञापत्रात कल्पना सोरेन यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे, ज्यात 91.97 लाख रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

कल्पना सोरेन यांच्या नावावर तीन गाड्या आहेत, ज्यामध्ये अर्बानिया, ह्युंदाई आय-20 आणि मारुती एक्सएल सिक्स यांचा समावेश आहे. रोख रक्कम 27.28 लाख रुपयांची आहे. बँकेत 85.20 लाख रुपये जमा आहेत. 61.46 लाख रुपये बाँड-डिबेंचर-शेअर्समध्ये गुंतवले आहेत. पीपीएफ आणि एलआयसीमध्ये 63.30 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.

कल्पना सोरेन यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, हेमंत सोरेन यांच्याकडे बँकेत 62.47 लाख रुपये जमा आहेत, 52.46 लाख रुपयांचे बाँड-डिबेंचर-शेअर्स, 43.39 लाख रुपयांचे पीपीएफ आणि एलआयसी आहेत. तसेच, हेमंत सोरेन यांच्याकडे 6.64 लाख रुपये रोख आणि 18.91 लाख रुपयांचे दागिने आहेत.

हेमंत सोरेन यांच्याकडे 2.83 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. हेमंत सोरेन यांच्या नावावर 2008 मॉडेलची कार आहे, ज्याची किंमत 60 हजार रुपये आहे. याशिवाय, हेमंत सोरेन यांच्या नावावर 25 लाखांचे कर्ज आहे.