एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘स्टार’ भाऊ-बहिणींच्या जोड्या; पाहा त्यांचे ‘खास’ फोटो! राखी पौर्णिमा स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:20 PM2023-08-29T17:20:07+5:302023-08-29T18:32:39+5:30

Raksha Bandhan Special : रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan 202) बॉलिवूड सेलिब्रिटींचे त्यांच्या बहिण-भावांसोबतचे खास फोटोज पाहूया.

सेलिब्रिटींच्या कुटुंबियांबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता असते. सेलिब्रिटींनी त्यांच्या मित्र परिवारासह किंवा कुटुंबासह शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan 202) बॉलिवूड सेलिब्रिटींचे त्यांच्या बहिण-भावांसोबतचे खास फोटोज पाहूया.

करीना कपूर खान आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील हिट रिअल लाइफ भाऊ बहिण जोडीपैकी एक आहेत. लहानपणापासून ते चर्चेत आहेत.

अर्जुन कपूर त्याच्या बहिणींबद्दल नेहमीच प्रोटेक्टिव्ह असतो मग ती अंशूला असो किंवा सोनम कपूर असो. अंशूला अर्जूनची आईप्रमाणे काळजी घेते.

सलमान खान अर्पिता हे सख्खे बहिण भाऊ नसले तरी लहानपणापासून त्याने आणि पूर्ण कुटुंबाने तिला सगळ्यात जास्त जीव लावला आहे. तिच्यावर सलमानचे फार प्रेम आहे.

श्वेता अभिषेकपेक्षा मोठी आहे. सोशल मीडियावर या नेहमीच या भावा बहिणींचे प्रेम व्यक्त होताना दिसते. अभिषेकने अनेकदा श्वेतासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धार्थ कपूर तिचा मोठा आधारस्तंभ असल्याचे ती नेहमी सांगते.

ही बॉलिवूडची सर्वात स्टायलिश रिअल लाइफ भाऊ-बहीण जोडी मानली जाते. हुमा जरी मोठी असली तरी तिने सलीमच्या एका वर्षानंतर इंडस्ट्रीत प्रवेश केला. हूमाला साकीबने करिअरमध्ये आणि फिटनेस जर्नीमध्ये पाठिंबा दिल्याचं ती सांगते.

झोया आणि फरहान यांच्यात खूप मैत्रीपूर्ण आणि गोड नाते आहे, मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक पातळीवर. दोन भावंडांमध्ये झोया सर्वात मोठी असून त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत.

प्रियांकाचे भाऊ सिद्धार्थवर फार प्रेम आहे. ती आपल्या व्यस्त रुटीनमधून वेळात वेळ काढून त्याच्याबरोबर रक्षाबंधन साजरी करते..

सना कपूर आणि शाहिद कपूर ही अतिशय प्रेमळ भावा-बहिणींची जोडी आहे.

सारा खान आणि इब्राहिम सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतात. त्यांच्या बॉन्डींगची झलक नेहमीच दिसते.