Neeraj Chopra: तुला गर्लफ्रेंड आहे का? लग्न कधी करतोयस? कपिल देवनी नीरज चोप्राला विचारला प्रश्न, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 01:30 PM2021-08-09T13:30:20+5:302021-08-09T13:36:40+5:30

Neeraj Chopra girlfriend? : नीरज चोप्राला (Neeraj Chopra) आज कोण ओळखत नाही? ज्याच्या त्याच्या फोनमध्ये, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टावर गेले दोन दिवस त्याचाच फोटो होता. 23 वर्षांच्या या भालाफेक पटूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काय जिंकले धडाधड बक्षीसांची लयलूट त्याच्यावर होऊ लागली. त्याचे खासगी आयुष्य ते ही मैदाना बाहेर कसे आहे यामध्ये लोकांची रुची वाढू लागली आहे.

नवी दिल्ली : नीरज चोप्राला (Neeraj Chopra) आज कोण ओळखत नाही? ज्याच्या त्याच्या फोनमध्ये, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टावर गेले दोन दिवस त्याचाच फोटो होता. (Neeraj Chopra has girlfriend? when will he marry? Kapil dev Ask him some question about Private life)

23 वर्षांच्या या भालाफेक पटूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काय जिंकले धडाधड बक्षीसांची लयलूट त्याच्यावर होऊ लागली. आजवरच्या या बक्षीसांचा आकडा हा 16 कोटींहून अधिक झाला आहे. (Neeraj Chopra has girlfriend? Kapil dev ask him.)

त्याचा हा पराक्रम सर्व जगाने पाहिला. परंतू त्याचे खासगी आयुष्य ते ही मैदाना बाहेर कसे आहे यामध्ये लोकांची रुची वाढू लागली आहे.

महान क्रिकेटर कपिल देव यांनी एका कार्यक्रमात नीरज चोप्राला त्याच्या खासगी आयुष्यावर प्रश्न विचारला आहे. यावर नीरज लाजला.

एबीपी न्यूजवर झालेल्या या चर्चेत कपिल देव (Kapil dev) य़ांनी त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारले. या प्रश्नावर नीरजचा चेहरा खुलला. त्याने सांगितले, सध्या त्याचे लक्ष खेळावर आहे.

कविल देव म्हणाले की, तुझे पालक सांगतायत की तू आणखी दोन वेळा सुवर्ण पदक घेऊन येशील. म्हणजे पुढचे 7-8 वर्षे आणखी लागतील. तुझे लग्न लावून द्यायचा त्यांचा विचार दिसत नाहीय. तुला हे मान्य आहे का?

नीरज चोप्राने यावर लाजत उत्तर दिले, मला माहिती नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते देखील होईल. सध्या मन आणि ध्यान खेळावरच आहे. पुढ जे होईल बघू.

यावर कपिल देव यांनी विचारले की, असे तर नाहीय तुझी गर्लफ्रेंड आहे? किंवा आई-वडिलांवर सोडलेयस. ते सांगतील त्याच मुलीशी लग्न करणार?

यावर नीरजने हसत उत्तर दिले. मी सध्या खेळावर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काळात काहीही होऊ शकते. आई-वडिलांना चांगले वाटले ते देखील ठीक आहे. मला एखादी आवडली तर मी त्यांच्याशी बोलेन. जर ते तयार झाले तर... काहीही होऊ शकते, असे तो म्हणाला.

कपिलने जेव्हा नीरजला शुभेच्छा दिल्या तेव्हा नीरजने त्यालाही रिप्लाय दिला. तुमच्यासारख्या मोठ्या खेळाडूंना पाहूनच आम्ही शिकलो आहोत. आता आम्ही चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण पुढील पिढी त्यापेक्षा जास्त चांगले करू शकेल.

Read in English