रशिया-यूक्रेन युद्धाला नवं वळणं येणार?; पहिल्यांदाच भारताची थेट एन्ट्री होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:35 PM2023-04-08T16:35:38+5:302023-04-08T16:40:39+5:30

रशियन हल्ल्यानंतर पहिल्यांदाच युक्रेनचे मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत. युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री इमिने झापरोवा पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येत असल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून यूक्रेन रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. अद्यापही याचा निकाल लागलेला नाही. त्यात आता यूक्रेन मंत्री पहिल्यांदाच भारतात येत असल्याने या युद्धावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

युक्रेनचे मंत्री इमिने अशा वेळी भारतात येत आहेत, जेव्हा भारताचा मॉस्कोसोबतचा व्यापार सातत्याने नवीन उंची गाठत आहे. इमिन रशियासोबत सुरू असलेल्या युद्धावर आपली बाजू भारताकडे मांडतील असे मानले जात आहे. वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धात भारताने अद्याप तटस्थ भूमिका स्वीकारली आहे.

पाकिस्तान युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे निर्यात करून पैसे कमवत आहे, त्यावर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. शांतता आणि संवाद हाच पुढे जाण्याचा मार्ग असल्याचे भारताने वारंवार सांगितले आहे. युक्रेनचे मंत्री भारतातील दोन प्रमुख थिंक टँकसह या कार्यक्रमात सहभागी होतील.

भारत गेल्या वर्षभरापासून युक्रेनला मानवतावादी मदत करत आहे. आतापर्यंत मदत साहित्याच्या १० खेप पाठवण्यात आल्या आहेत. या मदतीमध्ये अनेक आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे आहेत. युक्रेनने गेल्या वर्षी आपले राजदूत परत बोलावले होते आणि आतापर्यंत कोणत्याही नवीन राजदूताची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारताचा शत्रू पाकिस्तान पाश्चिमात्य देशांमार्फत युक्रेनला शस्त्रे आणि दारूगोळा पुरवून प्रचंड पैसा कमवत आहे. या सर्व घडामोडींवर भारताचे लक्ष आहे.

या आठवड्यात भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत मतदानापासून दूर राहिले. यामध्ये युद्ध गुन्ह्यांचा तपास एक वर्षासाठी वाढवण्याचा प्रस्ताव होता. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री इमिने झापारोवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कीव भेटीचे निमंत्रण देऊ शकतात.

भारत सरकारसोबतच्या चर्चेदरम्यान झापरोवा या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या १०-सूत्री शांतता मुद्द्यांवर बोलतील. याशिवाय, त्या भारताला 'महत्त्वाचा जागतिक आवाज' त्यांच्या बाजूने सहमती देण्यासाठी आवाहन करतील.

विशेष म्हणजे युद्धावेळीही युक्रेन सतत भारताशी संपर्कात आहे. रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी पीएम मोदींशी अनेकदा बोलले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे यूक्रेनचे मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशीही चर्चा केली आहे. याशिवाय युक्रेनने मानवतावादी मदतीसाठी भारताचे आभार मानले आहेत.

झापरोवा यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर आता रशियातील अनेक मोठे नेते भारतात येण्याच्या तयारीत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे देखील ५ मे रोजी SCO बैठकीसाठी येणार आहेत. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जुलैमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.

यूक्रेनच्या पहिल्या उपपरराष्ट्र मंत्री इमिने झापरोवा सोमवारी भारतात येणार आहेत. त्या ४ दिवसांसाठी देशात राहतील. ३९ वर्षीय झापरोवा याच्या २०२० मध्ये यूक्रेनच्या मंत्री झाल्या. राजकारणात येण्याआधी इमिने या पत्रकार होत्या. Crimea Realities न्यूज चॅनेलमध्ये त्या न्यूज एडिटर होत्या.