ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

Virat Kohli Chris Gayle Video, IPL 2024 RCB vs CSK : विराटने ख्रिस गेलला दिलेली ऑफर व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:16 PM2024-05-20T12:16:07+5:302024-05-20T12:17:04+5:30

whatsapp join usJoin us
Chris Gayle to play in IPL 2025 as Impact player rule Virat Kohli video goes viral after IPL 2024 RCB vs CSK match | ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Chris Gayle Video, IPL 2024 RCB vs CSK :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार पुनरागमन करत यंदाच्या स्पर्धेत प्ले-ऑफ्सचे तिकीट मिळवले. अतिशय दडपणाच्या सामन्यात RCBने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारली. शेवटच्या साखळी सामन्यात बेंगळुरूने चेन्नईचा 27 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करून 218 धावा करणाऱ्या RCBला प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी CSKच्या संघाला 200 पेक्षा कमी धावांवर रोखणे गरजेचे होते. ती किमया साधत RCB दमदार कामगिरी केली. या विजयानंतर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल विराट बरोबर चर्चा करताना दिसला. त्यांच्या एका व्हिडीओमुळे ख्रिस गेल पुढच्या वर्षी RCB कडून खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

RCBच्या शेवटच्या साखळी सामन्यात ख्रिस गेल स्टेडियममध्ये त्यांनी चिअर करायला आला होता. बरेच वर्ष ख्रिस गेल RCBकडून खेळला. त्याने तुफान फटकेबाजी करत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केली. सामना संपल्यानंतर ख्रिस गेल RCBच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचे अभिनंदन करायला आला. त्याने सर्व खेळाडूंची भेट घेतली. यावेळी विराट आणि ख्रिस गेल यांच्यात झालेल्या मजेशीर संवादामुळे ख्रिस गेल पुढच्या वर्षी खेळणार की काय अशी चर्चा रंगली आहे.

विराट कोहली आणि ख्रिस गेलचा ड्रेसिंग रुममध्ये संवाद झाला. विराट ख्रिस गेलला म्हणाला- "पुढच्या वर्षी तू पुन्हा आमच्या संघात ये, खेळायला सुरुवात कर. इम्पॅक्ट प्लेयरचा नवा नियम आला आहे. तुला आता फिल्डिंग करण्याची गरज नाही. फक्त बॅटिंग करायची आणि नंतर बसून राहायचे. हा नियम जणू तुझ्यासाठीच बनवला आहे" ख्रिस गेल यावर फक्त हसला. पण त्यानंतर सोशल मीडियावर मात्र याबद्दल चर्चा रंगली. आता विराटचं मजेत म्हटलेलं वाक्य ख्रिस गेल खरंच मनावर घेतो का, हे पाहणं खरंच रंजक ठरेल.

Web Title: Chris Gayle to play in IPL 2025 as Impact player rule Virat Kohli video goes viral after IPL 2024 RCB vs CSK match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.