प्रेरणादायी! UPSC साठी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, 2 वेळा नापास पण जिद्दीने झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:20 PM2023-04-08T16:20:04+5:302023-04-08T16:25:49+5:30

IAS Vishakha Yadav : एका तरुणीने इंजिनिअरिंगनंतर चांगले पॅकेज असूनही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली

चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्यानंतर ती नोकरी सोडणं खूप कठीण आहे. सहसा लोक विचार करतात की नोकरीमध्ये आणखी काही चांगलं कसं करावे. पण असे काही लोक आहेत ज्यांना असं वाटत नाही. चांगले पॅकेज असूनही ते केवळ नोकरी सोडतात कारण पुन्हा अभ्यास करून यूपीएससी सिव्हिल परीक्षेची तयारीही सुरू करता येईल.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एका तरुणीने इंजिनिअरिंगनंतर चांगले पॅकेज असूनही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत यश तर मिळालेच पण उत्तम रँकही मिळवला.

विशाखा यादव असं या तरुणीचं नाव आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा त्यांचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. विशाखा यादव या राजधानी दिल्लीतील आहेत. त्यांचे शालेय शिक्षणही येथेच पूर्ण झाले आहे.

विशाखा यांनी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण केली आणि दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीटीयू) मध्ये बीटेकमध्ये प्रवेश घेतला. DTU मधून B.Tech ची पदवी घेतल्यानंतर, विशाखाला संस्थेकडून चांगल्या पॅकेजवर नोकरीची ऑफरही देण्यात आली. त्यांनी ते मान्यही केले.

नोकरीच्या दोन वर्षांच्या काळात ही नोकरी हे आपलं ध्येय नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यांना आणखी काहीतरी साध्य करायचे आहे असं वाटू लागलं. त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

पूर्ण तयारीनंतर विशाखा प्रिलिम्स परीक्षेला बसल्या पण त्यात यश मिळू शकले नाही. हे त्याच्यासोबत एकदा नव्हे तर दोनदा घडलं. दोन्ही प्रयत्नांमध्ये प्राथमिक परीक्षेत नापास झाल्या.

विशाखा यादव यानंतर खूप निराश झाली. मात्र, ही निराशा त्यांनी आपल्यावर भारी पडू दिली नाही. थोडा धीर धरला. विशाखा तयारी करत राहिल्या. गेल्या दोन वेळा झालेल्या चुकांवर काम करत राहिल्या.

तिसरा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मेहनतीत कोणतीही कमतरता नव्हती. विशाखा यांनी परीक्षेत बसून तिन्ही टप्पे पार केले आणि यश मिळवले. फक्त यश मिळाले नाही तर परीक्षेत 6 वा रँकही मिळवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व फोटो - ट्विटर