सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 08:59 AM2024-05-18T08:59:54+5:302024-05-18T09:00:20+5:30

Gurucharan singh: गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. तो दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाला पण मुंबईपर्यंत पोहोचलाच नाही.

taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-sodhi-aka-gurucharan-singh-return-home-after-25-days-of-missing | सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan singh) गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता होता.त्याच्या अशा अचानक गायब होण्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्याच्या वडिलांनीही त्याची हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, तब्बल २५ दिवसानंतर तो घरी परतला आहे. घरी आल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली असून तो इतके दिवस नेमका कुठे गेलो होता हे त्याने सांगितलं आहे.

'आज तक'ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग तब्बल २५ दिवसानंतर घरी परतला असून तो तीर्थयात्रेला गेला होता. संसारचा त्याग करुन तो घराबाहेर पडला होता. त्यामुळे कधी अमृतसर तर कधी लुधियाना अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. त्याच्या सांगण्यानुसार, तो वेगवेगळ्या शहरांमधील गुरुद्वारांमध्ये मुक्काम करत होता.

दरम्यान, गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. तो दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाला पण मुंबईपर्यंत पोहोचलाच नाही. जवळपास २६ एप्रिल रोजी ही घटना समोर आली. त्यानंतर त्याचा शोधाशोध घेण्यात आला पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. अखेर २५ दिवसानंतर तो स्वगृही परतला आहे.

Web Title: taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-sodhi-aka-gurucharan-singh-return-home-after-25-days-of-missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.