Coronavirus : दिलासादायक! देशात 1992 जणांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 03:17 PM2020-04-18T15:17:59+5:302020-04-18T15:44:51+5:30

Coronavirus : भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

कोरोनाविरोधात भारत लढत आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14,000 हून अधिक झाली असून आतापर्यंत 480 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. याच दरम्यान कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे.

देशात 1992 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या रुग्णालयांत 11,906 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

भारतात आतापर्यंत 1900 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जगात 571,577 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,250,432 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे

जगात 571,577 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 37,158 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.