कमाल! गुगलची चांगली नोकरी सोडली अन् UPSC ची तयारी केली; कोचिंगशिवाय झाला IAS टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 07:14 PM2023-03-20T19:14:02+5:302023-03-20T19:18:43+5:30

IAS Anudeep Durishetty : आपल्या चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून UPSC तयारी सुरू केली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय IAS टॉपर बनला आहे.

दरवर्षी 8 लाखांहून अधिक लोक UPSC नागरी सेवा परीक्षेत बसतात, ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा आहे. आयएएस-आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणारे कष्ट करतात. पण काही मोजकेच उमेदवार हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.

आपल्या चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून UPSC तयारी सुरू केली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय IAS टॉपर बनला आहे. कोचिंगशिवाय यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करणेही अवघड आहे. पण अशक्य वाटणारे हे काम आयएएस अनुदीप दुरीशेट्टी यांनी करून दाखवले आहे.

फक्त यूपीएससी उत्तीर्णच केले नाही तर ऑल इंडिया नंबर 1 रँक मिळवला आहे. आयएएस अनुदीप दुरीशेट्टी तीन वेळा अपयशी ठरले पण त्यांनी आपले लक्ष ध्येयावर ठेवले. अखेरीस ते आयएएस होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया.

IAS अनुदीप दुरीशेट्टी यांनी 2017 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले. 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली. ज्यामध्ये ते अयशस्वी ठरले. यानंतर, 2013 मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि भारतीय महसूल सेवेत (IRS) निवड झाली.

अनुदीप दुरीशेट्टीचे सुरुवातीपासूनचे ध्येय आयएएस होण्याचे होते. त्यांनी यापेक्षा कमी काही स्वीकारले नाही. त्यामुळेच आयआरएस झाल्यानंतरही त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली.

2014 आणि 2015 मध्ये ते पुन्हा नागरी सेवा परीक्षेत बसले. मात्र यावेळीही क्रॅक करता आली नाही. तथापि, अनुदीपने हार मानली नाही आणि शेवटी 2017 मध्ये UPSC टॉपर बनले. त्यांना ऑल इंडिया पहली रँक मिळाला होता.

IAS अनुदीप दुरीशेट्टी यांनी कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. तयारीदरम्यान मार्गदर्शनासाठी इंटरनेटची मदत घेतली. याच दरम्यान ते हैदराबादमध्ये महसूल विभागात सहाय्यक आयुक्त पदावरही कार्यरत होते.

IAS अनुदीप दुरीशेट्टी हे मूळचे तेलंगणातील मेटपल्ली शहरातील आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण श्री सूर्योदय हायस्कूल आणि श्री चैतन्य कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. यानंतर त्याने 2011 मध्ये राजस्थानच्या BITS पिलानी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले.

बीटेकनंतर अनुदीपल यांना गुगलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तेथे त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले. आयएएस अनुदीप दुरीशेट्टी हे तेलंगणातील पहिले UPSC टॉपर आहेत. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.