CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:00 PM2020-05-17T17:00:31+5:302020-05-17T17:32:35+5:30

आज संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली आहे. कोरोना व्हायरसने जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाले आहे. अशातच भारतासह अनेक देश कोरनावरील व्हॅक्सीन आणि औषधी तयार करण्यासाठी कंबंर कसून काम करत आहेत.

कोरोनावर सध्या निश्चित स्वरुपाचे कुठलेही औषध उपलब्ध नाही. मात्र, कोरोनाच्या लक्षणांवर उपचार केला जात आहे आणि लोक बरेही होत आहेत. अशातच, पुण्यातील एका फार्मा कंपनीने कोरोनावरील उपचारात यशस्वी ठरेल, असे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. 2200 ओषधांवर संशोधन केल्यानंतर या कंपनीने तीन औषधे शोधून काढली आहेत.

नोवलिड कंपनीने म्हटले आहे, की कोरोनावरील उपचारासाठी जवळपास 2200 औषधांचा प्रयोग केला जात आहे. कंपनीने या 2200 औषधांवर संशोधन केले आणि 42 प्रभावशाली औषधे निवडली. यानंतर यातून तीन, अशी औषधे निवडली, जी कोरोना संक्रमणाला मात देण्यात रामबाण सिद्ध होऊ शकतात.

कंपनीने म्हटले आहे, की ही तीन औषधे कोरोना संक्रमणाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी सर्वाधिक परिणामकारक आहेत. मात्र, या तीन औषधांमध्ये हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनचा समावेश नाही.

नोवलिड फार्मातील वैज्ञानिक सुप्रीत देशपांडे यांनी सांगितले की, या औषधांची मानवावर चाचणी करण्यासाठी डीजीसीआय अर्थात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागण्यात आली आहे.

सुप्रीत देशपांडे यांच्यामते, कोरोनाचा सामना करण्यात कोणते औषध रामबाण ठरू शकेल, याचा शोध घेण्यासाठी कंपनी 25 मार्चपासूनच कामाला लागली होती. यात, 2200 औषधे कुठल्याना कुठल्या प्रकारे कोरोनासारख्या व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी वापरले जात आहेत. यातील सर्वात यशस्वी औषध शोधून काढणे अवघड काम होते.

नोवलिड फार्मा कंपनीचे 20 वैज्ञानिक बऱ्याच दिवसांपासून हे संशोधन करत होते. 2200 पैकी सर्वप्रथम 42 औषधे शोधली गेली आणि नंतर तीन सर्वात यशस्वी औषधांची निवड केली गेली. मात्र, अद्याप या औषधांचे मानवावर ट्रायल होणे बाकी आहे.

डीजीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर या औषधांच्या ट्रायलला सुरुवात होईल. सर्वकाही ठीक असल्यास ही औषधे कोरोनावरील उपचारासाठी उपलब्ध होतील.

Read in English