अरे हा तर हनुमानाचा अवतार! ७० सेमी लांब शेपटीमुळे तरुणाची चर्चा; पाहणारे सारेच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:58 PM2022-04-15T16:58:22+5:302022-04-15T17:03:04+5:30

तरुणाच्या कमरेवर जवळपास अडीच मीटरची शेपटी; सोशल मीडियावर चर्चा 'हनुमानाच्या अवतारा'ची

एका तरुणाच्या कमरेवर अजब प्रकारे केस आले आहेत. केसांचा आकार वाढतच गेल्यानं आता ते शेपटीसारखे दिसू लागले आहेत. स्थानिक पुजाऱ्यानं हा तरुण हनुमानाचा अवतार असल्याचं म्हटलं आहे.

कमरेवर शेपटासारखे केस आल्यानं तरुणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा तरुण नेपाळचा आहे. त्याचं नाव देशांत अधिकारी. तो १६ वर्षांचा आहे.

देशांतच्या कमरेवर मागील बाजूस केस आले आहेत. त्यांची लांबी ७० सेंटिमीटर इतकी आहे. त्यामुळे देशांतला शेपटी आली आहे की काय असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडतो.

कमरेवर आलेले केस दिशांतला अडचणीचे वाटतात. आधी तो हे जगापासून लपवायचा. उपचारांसाठी देशांतच्या आई वडिलांनी त्याला नेपाळसह परदेशातील अनेक रुग्णालयांमध्ये नेलं. मात्र कमरेवरील केसांची वाढ रोखणं कोणत्याच डॉक्टरांना शक्य झालं नाही.

वैद्यकीय उपचारांना यश न आल्यानं देशांत एका पुजाऱ्याकडे गेला. देशांत हनुमानाचा अवतार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे देशांत आणि त्याचे पालक खूष झाले. सोशल मीडियावर देशांतची शेपटी चर्चेचा विषय ठरली.

आता जगाला शेपटी दाखवण्यात कोणतीच समस्या नसल्याचं देशांत म्हणाला. टिकटॉकवर माझा एक व्हिडीओ व्हायरल झाला. आता अनेकजण मला शेपूट कसं आलं त्याची चर्चा करत आहेत. मला छान वाटतंय, असं देशांतनं सांगितलं.

नेपाळमधील चित्रपट निर्मात्यानं देशांतची एक मुलाखत घेतली. व्हिडीओमध्ये त्याची शेपटी दाखवण्यात आली. देशांतच्या कमरेवर केस असल्याचं त्याच्या आई बाबांना त्याच्या जन्मानंतर ५ दिवसांनी समजलं. त्यांनी उपचार शोधण्याचा प्रयत्न केला. पण हाती अपयश आलं.

शेपूट कंगव्यानं विंचरू नकोस, ती कापूदेखील नकोस, असं पुजाऱ्यांनी देशांतला सांगितलं. देशांतमध्ये हनुमानाचा अवतार असू शकतो, असं पुजारी म्हणाले. त्यानंतर देशांतने शेपटी वाढू दिली.