Shiv Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसायचे?; बघा जगभरातील त्यांची 'ही' चित्रे....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:57 AM2021-02-19T10:57:35+5:302021-02-19T11:12:07+5:30

Shivaji Maharaj Jayanti : : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. शिवाजी महाराजांबद्दल(Chatrapati Shivaji Maharaj) जाणून घ्यायला प्रत्येक शिवप्रेमींना आवडत असते. शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे(Shivaji Maharaj Original Pics) हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

Shivaji Maharaj Jayanti : जगभरातील संग्रहालयात शिवरायांची(Shivaji Maharaj Original Pic) अनेक जुनी चित्रे आढळतात, यात काही महाराज हयात असताना काढली असल्याचं दावा करण्यात येतो. मात्र बहुतांश चित्रे महाराजांच्या मृत्यूनंतर काढण्यात आली आहेत.

साधारणपणे १८ व्या शतकात काढलेलं हे चित्र, बडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे. त्यात एका हातात फूल तर डाव्या हातात पट्टा अन् कमरेला ढाल आहे.

शिवरायांची खूप कमी जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत. यामध्ये मॉस्को येथील संग्रहालयात ठेवलेले हे छायाचित्र

१८७२ मधील रॉबर्ट आर्म यांच्या Historical Fragments या पुस्तकात हे चित्र छापलं आहे.

किशनगड येथील महाराज सावंतसिंग यांचे चित्रकार निहाल चंद्र यांनी १७५० मध्ये हे चित्र काढलं. यात राजांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात दानपट्टा दाखवण्यात आला आहे. हे चित्र लंडनमधील बॉनहॅम्सच्या संग्रहालयात आहे.

फ्रांस्वा वॅलेंटीन या डच अधिकाऱ्यांच्या संग्रहालयातील हे चित्र १७६२ मध्ये प्रसिद्ध झाले असून यावर Den Heer Seva Gi असं लिहिलं आहे.

Read in English