संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:47 PM2021-05-28T13:47:15+5:302021-05-28T13:53:54+5:30

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत.

पुरातत्ववाद्यांना जगातला सर्वात जुन्या सोन्याचा दागिना सापडला आहे. हा दागिना एका महिलेच्या कबरेत सापडला. या महिलेला ३८०० वर्षाआधी दफन करण्यात आलंहोतं. मृत्यूवेळी या महिलेचं वय २० वर्षे असेल. हा दागिना जर्मनीच्या तबिन्जेनमध्ये सापडला आहे. इथे काही प्राचीन कबरींचं खोदकाम सुरू आहे. तेव्हाच त्यांना सोन्याचा हा दागिना सापडला. असं मानलं जात आहे की, या दागिन्याचा वापर महिला आपल्या केसांमध्ये बॅंडसारखा करत असेल.

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. असं मानलं जात आहे की, हा नदीतून वाहून आलेल्या सोन्याचा नैसर्गिक धातू असेल. हा इंग्लंडच्या कॉर्नवेल भागातून वाहणारी नदी कॉरनॉनमधून वाहून जर्मनीच्या दक्षिण-पश्चिम भागात गेला असेल. तिथे हा धातू दागिने बनवण्यासाठी वापरला असेल.

वैज्ञानिकांचं मत आहे की, दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये त्यावेळी असा किंमती धातू मिळणं फार दुर्मीळ होतं. जर्मनीच्या तबिन्जेन जिल्ह्यात सापडलेल्या या सोन्याच्या दागिन्यावरून हे समजतं की, त्यावेळी ब्रिटन आणि फ्रान्सच्या सांस्कृतीक समूहांचं प्रभाव होता. या समूहांनी दुसऱ्या शतकात मध्ये यूरोपमध्ये आपला प्रभाव वाढवला असावा. या २० वर्षीय महिलेची कबर पाहिल्यावर समजलं की, तिचं डोकं दक्षिण दिशेकडे होतं. ही कबर एक प्री-हिस्टॉरिक डोंगरावर आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ तबिन्जेनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ प्रीहिस्ट्री अॅन्ड मेडिवल आर्किओलॉजीचे प्राध्यापक रायको क्रॉस यांनी सांगितलं की आम्ही त्या महिलेच्या अवशेषांची टेस्ट केली. ज्यातून समोर आलं की, तिला काहीही जखम किंवा आजार नव्हता. त्यामुळे हे समजू शकलं नाही की, तिचा मृत्यू कसा झाला. (प्रतिकात्मक छायाचित्र)

या शोधातून हे समजतं की, ही महिला त्यावेळच्या उच्च वर्गाशी संबंधित असेल. वैज्ञानिकांनी रोडिओकार्बन डेटिंगने महिलेच्या वयाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यातून समोर आलं की, महिला ईसवी पूर्व १८५० ते १७०० ईसवीपूर्व दरम्यान मृत झाली असेल. जर्मनीच्या इतिहासात असा एकही पुरावा नाही ज्याने हे समजेल की, या भागात सोनं सापडल्याचा काही पुरावा मिळेल. (प्रतिकात्मक छायाचित्र)

वैज्ञानिकांनी सांगितलं की, या महिलेची काहीही ओळख पटली नाही. कारण जर्मनी किंवा तबिन्जेनमध्ये प्राचीन इतिहासाचे कोणतेह कागदपत्रे सापडली नाहीत. या शोधाबाबत २१ मे ला जर्नल Praehistorische Zeitschrift मध्ये रिपोर्ट प्रकाशित झाला. या सोन्याच्या दागिन्याचा शोध गेल्यावर्षी लागला होता. पण रिपोर्ट समोर यायला एक वर्ष लागलं.

याआधी २०१६ मध्ये बुल्गेरियामध्ये वैज्ञानिकांना ४५००-४६०० ईसवीपूर्व काळातील सोन्याचा दागिना सापडला होता. हा दागिना तांबे युगाच्या दोनशे वर्षआधीचा आहे. त्यानंतर प्रोसेस्ड गोल्डचा शोध १९७२ मद्ये लागला होता.

(प्रतिकात्मक छायाचित्र)